शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जातीची बंधने झुगारुन जुळल्या रेशीमगाठी!

By admin | Updated: February 14, 2017 00:27 IST

एक वर्षात २0७ आंतरजातीय प्रेमविवाह.

बुलडाणा, दि. १३- प्रेमात फुलांबरोबर येणारे काटे हे प्रेमवीरांना नेहमीच बोचणारे असतात. कुटूंबाकडून होणारा विरोध आणि जातीची तेढ निर्माण करुन प्रेमाला आवर घालण्याचा प्रयत्न जालीम जमाना करतो. मात्र, या जातीच्या बंधनाला झुगारुन तेरा महिन्यात जिल्ह्यात २0७ आंतरजातीय प्रेमीजोडपी विवाहाच्या रेशीमगाठीत बांधल्या गेले.एकमेकांशी प्रेम करणारे कधीच जगाची पर्वा करीत नाही. पण कुटुंबाचा व समाजाचा विरोध व रोष त्यांच्या पाचवीला पुजलेला असतो. सोबत जगण्याच्या आणाभाका घेऊनही प्रेमात यश मिळाले नाही, तर बर्‍याच वेळा युवक-युवतींनी मृत्यूला कवटाळले, अशा घटना बर्‍याच घडल्या आहेत. या गोष्टीमुळे समाज ढवळून निघाला खरा, मात्र समाजाची मानसिकता बदलली नाही. समाजाची मानसिकता बदलून जातीय तिढा सुटावा, विविध धर्माच्या संस्कृतीचा मिलाप व्हावा, यासाठी शासनाने सुद्धा २0१0 नंतर आंतरजातीय विवाह करणार्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध योजना अंमलात आणल्या आहे. मात्र तरीही प्रेमी युगुलाकडे पाहण्याची समाजाची वक्रदृष्टी तीळमात्रही बदलली नाही.या जातीच्या बंधनाला झुगारुन जिल्ह्यात २0१६-२0१७ मध्ये २0७ आंतरजातीय युगुल विवाहाच्या रेशीमगाठीत अडकले. यात २0१६ मध्ये जानेवारी महिन्यात १५, फेब्रुवारी १0, मार्चमध्ये ३0, एप्रिल २५, मे महिन्या २0, जून १0, जुलै ५, ऑगस्ट मध्ये १८, सप्टेंबर १५, ऑक्टोबर १६, नोब्हेंबर २५, डिसेंबर महिन्यात ७ आणि जानेवारी २0१७ मध्ये १0 अशी आंतरजातीय प्रेमीयुगुलांनी विवाहासाठी नोंदणी केली.

प्रोत्साहन रकमेत तीन लाखांनी वाढ आंतरजातीय विवाह करणार्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी शासनाने २0१0 नंतर विविध नवीन योजना अंमलात आणल्या. यात आंतरजातीय विवाह झाल्यानंतर जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो. या योजनेंतर्गत जोडप्यांना ५0 हजार रुपयांचा धनादेश दिला जातो. शिवाय त्यांना कायद्याचे संरक्षण मिळते. २0१६ नंतर शासनाने अशा आंतरजातीय विवाहित जोडप्यांना मिळणार्‍या प्रोत्साहन रकमेत तीन लाख रुपयांपर्यंत वाढ केली आहे.