शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

स्वबळामुळे सभापती निवडणूक अडचणीत

By admin | Updated: October 2, 2014 23:58 IST

विधानसभा निवडणुकीची समीकरणामुळे जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक अडचणीत आली आहे.

बुलडाणा : जिल्हा परिषद अध्यक्ष- उपाध्यक्ष पदाची निवडणूक २१ सप्टेंबर रोजी पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस आघाडीने एकसंघता कायम ठेवत ही दोन्ही पदे जिंकली. या निवडणुकीदरम्यान राज्यस्तरावरील आघाडी दुभंगली गेली व आता या प्रकारामुळे जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदाची निवडणूक अडचणीत आली आहे. बांधकाम, समाजकल्याण, महिला बालकल्याण व कृषी, पशुसंवर्धन या चार सभापती पदांसाठी ही निवडणूक होणार आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीतील तडजोडीप्रमाणे बांधकाम आणि समाजकल्याण ही पदे काँग्रेसकडे, तर महिला बालकल्याण व कृषी सभापती ही पदे राष्ट्रवादीकडे देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल पाहता काँग्रेस व मित्रपक्षांकडे आता २९ सदस्य झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीसोबतची आघाडी कायम राहिली नाही तर जिल्हा परिषदेमधील गणिते नव्याने मांडावी लागतील. दरम्यान, सभापती पदांची अदालाबदल करण्याचेही संकेत सूत्रांनी दिले असून, सभापती पदाच्या शर्य तीमध्ये अनेक जि.प. सदस्य उतरले आहेत. थेट दिल्ली, मुंबईपर्यंत या पदांसाठी लॉबिंग केली जात असून, दसर्‍यानंतर सभापती पदाचं ह्यसोनंह्ण कुणाला मिळणार, याची उत्सुकता लागून आहे.आघाडी आणि महायुती दुभंगल्यामुळे सध्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वबळाची भाषा सर्वत्र आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीतच येत्या ४ ऑक्टोबरला जि.प. सभापती पदाची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत स्वबळाचे बळ आजमावण्याची संधी काँग्रेसला आहे; मात्र तसे न झाल्यास विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात चिखलफेक करणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादीला मिनी मंत्रालयात मात्र पुन्हा आघाडीचा सूर आळवावा लागेल, अशीच परिस्थिती भाजपा-सेनेची आहे.