शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १३ तूर खरेदी केंद्रं सुरू!

By ram.deshpande | Updated: July 26, 2017 01:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सहकार व पणन विभागाच्या २१ जुलै २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार ज्या शेतकºयांनी तूर खरेदी केंद्रावर ३१ मे २०१७ पर्यंत तूर विक्रीबाबत नोंद केलेली आहे, अशा शेतकºयांची तूर राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत ३१ जुलैपर्यंत खरेदी करण्यात येणार आहे.जिल्ह्यात १३ तूर खरेदी केंद्र संबंधित तालुक्याच्या कृषी बाजार ...

ठळक मुद्दे३१ जुलैपर्यंत चालणार तूर खरेदी ११४ शेतक-यांच्या १८५६ क्विंटल तुरीची खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सहकार व पणन विभागाच्या २१ जुलै २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार ज्या शेतकºयांनी तूर खरेदी केंद्रावर ३१ मे २०१७ पर्यंत तूर विक्रीबाबत नोंद केलेली आहे, अशा शेतकºयांची तूर राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत ३१ जुलैपर्यंत खरेदी करण्यात येणार आहे.जिल्ह्यात १३ तूर खरेदी केंद्र संबंधित तालुक्याच्या कृषी बाजार समितीमध्ये सुरू करण्यात आलेली आहेत. या तूर खरेदी केंद्रावर तुरीची खरेदी करण्यात येत आहे; तूर खरेदी करण्यासाठी आवश्यक सहकार्य व योगदान देण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे. ३१ मे २०१७ पूर्वी तुरीची नोंदणी केलेल्या शेतकºयांनी संबंधित तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजार समितीमध्ये तूर विक्रीस आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत २५ जुलै २०१७ रोजी जिल्ह्यात बुलडाणा तूर खरेदी केंद्रावर ६ शेतकºयांची १५० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली, तसेच मोताळा येथील केंद्रावर १० शेतकºयांची १५० क्विंटल, मलकापूर येथे २० शेतकºयांची ५०० क्विंटल, नांदुरा येथे ७ शेतकºयांची ७0, जळगाव जामोद येथे ७ शेतकºयांची १०० क्विंटल, संग्रामपूर येथे ३ शेतकºयांची ६०, शेगाव येथे ३५ शेतकºयांची ४५०, खामगाव येथे ८ शेतकºयांची १०१ क्विंटल, चिखली येथील केंद्रावर २ शेतकºयांची २०, मेहकर येथे २ शेतकºयांची ५० क्विंटल, दे.राजा येथे ५ शेतकºयांची ४०, सिं. राजा येथे २ शेतकºयांची १५ क्विंटल आणि लोणार येथील खरेदी केंद्रावर ७ शेतकºयांची १५० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. अशाप्रकारे एकूण ११४ शेतकºयांची १८५६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.दक्षता घेऊनच शेतमाल आणावा- जालिंदर बुधवतबुलडाणा येथील कृउबासमध्ये शेतकºयांची शासकीय तूर खरेदी पूर्ववत सुरु करण्यात आली आहे. शेतकºयांनी शेतमाला ओला होणार नाही, याची दक्षता घेऊन बाजार समितीत तूर आणावी, असे आवाहन बाजार समितीचे सभापती जालिंदर बुधवत यांनी केले आहे. बुलडाणा बाजार समितीत तूर खरेदी सुरु करताना सहायक निबंधक बुलडाणा सांगळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी शिंगणे, बुलडाणा बाजार समितीचे सभापती जालींधर बुधवत, बाजार समितीचे सचिव वनिता साबळे, खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष नंदु खडके, बाजार समितीचे संचालक बबन खरे, प्रभाकर काळवाघे उपस्थित होते. ज्या शेतकºयांची शिल्लक राहिलेली तूर विक्रीकरिता बुलडाणा बाजार समितीमध्ये नाव नोंदणी केली आहे. त्या शेतकºयांनी सन २०१६-१७ चा सातबारा, पेरेपत्रक, आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स तसेच आपला शेतमाल पावसामुळे ओला होणार नाही, याची दक्षता घेऊनच प्रथम बुलडाणा बाजार समितीमध्ये कागदपत्रे तपासणीकरिता घेऊन येणे त्यानुसार आपल्याला तूर मोजणीकरिता दूरध्वनी फोनद्वारे बोलाविण्यात येईल. जेणे करुन आपल्या शेतमालाचे त्याच दिवशी मोजमाप होईल, याची नोंद घ्यावी व समितीस सहकार्य करावे, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा सचिव यांनी शेतकरी बांधवांना केले आहे.