शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

तूर व मूगडाळ पुन्हा शंभरीच्या उंबरठ्यावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 12:15 IST

Khamgaon News किरकोळ विक्रीत ९५ ते ९८ रुपये किलोने तूरडाळ ग्राहकांना खरेदी करावी लागत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : दुकानदारांकडून तूरडाळीचे भाव ऐकताच ग्राहकांचे डोळे पांढरे होत आहेत. कारण तूरडाळीचे भाव पुन्हा एकदा शंभरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. आयात कमी झाल्याचा हा परिणाम आहे. हरभरा डाळीचे भाव मात्र स्थित असल्याचे चित्र आहे.पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीचे परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीने दिसायला लागले आहेत.तूरडाळीच्या भावात ७०० ते ८०० रुपये वाढ होऊन सध्या ९,२०० ते ९,५०० रुपये क्विंटल विकते आहे, तर किरकोळ विक्रीत ९५ ते ९८ रुपये किलोने तूरडाळ ग्राहकांना खरेदी करावी लागत आहे. तूरडाळीपाठोपाठ मूगडाळीचे भाव २०० ते ३०० रुपयांनी वधारून ९,००० ते ९,५०० रुपये क्विंटल विकली जात आहे. ही डाळ ९४ ते ९७ रुपये किलोने विकत आहे. या दोन्ही डाळी महागल्याने सर्वसामान्य हैराण झाले आहेत.उडीद डाळही ८,००० ते ८,५०० रुपये तर मसूर डाळ ७,००० ते ७,५०० रुपये क्विंटल विकली जात आहे.ग्राहकांना थोडा दिलासा म्हणजे सर्वाधिक विक्री होणाऱ्या हरभरा डाळीचे भाव ५,२०० ते ५,५०० रुपयांवर स्थिर आहेत. आयात कमी झाल्याने व मागणी वाढत असल्याने डाळीचे भाव वधारल्याचे होलसेल व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. डाळी महागल्याने महिन्याचे बजेट बिघडल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शहरासह ग्रामीण भागातील ग्राहक व्यक्त करत आहेत.

व्यापाऱ्याचाच फायदातुरीचा हमीभाव ६,००० रुपये आहे. ७० टक्के शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील तूर ५,००० ते ५,५०० रुपये प्रति क्विंटलने व्यापाऱ्यांना विकली. आता मोठे व्यापारी, कंपन्यांकडे तुरीचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. आता तूर ६,९०० ते ७,००० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. हमीभावापेक्षा जास्त किमतीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा मोठ्या व्यापाऱ्यांनाच होत आहे. 

टॅग्स :khamgaonखामगाव