शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

समाज उन्नतीसाठी प्रयत्न करा - सुरेश धोत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:49 IST

वडार समाज हा मागासलेला समाज आहे. या  समाजात शिक्षणाचा अभाव, गोरगरीब लोक मेहनत करून  आपली उपजीविका चालवतात. शासनाकडून या समाजाच्या  हितासाठी आतापर्यंत कोणत्याच फायद्याच्या योजना सुरू  केलेल्या नाहीत. शासनाच्या विविध योजनांपासून हा समाज  वंचित राहिलेला आहे. त्यामुळे आता समाजबांधवांनी जागृत  होऊन समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन  ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुरेश  धोत्रे यांनी केले आहे.

ठळक मुद्दे‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेचा जिल्हा मेळावासमाजाच्या  हितासाठी कोणत्याच फायद्याच्या योजना नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: वडार समाज हा मागासलेला समाज आहे. या  समाजात शिक्षणाचा अभाव, गोरगरीब लोक मेहनत करून  आपली उपजीविका चालवतात. शासनाकडून या समाजाच्या  हितासाठी आतापर्यंत कोणत्याच फायद्याच्या योजना सुरू  केलेल्या नाहीत. शासनाच्या विविध योजनांपासून हा समाज  वंचित राहिलेला आहे. त्यामुळे आता समाजबांधवांनी जागृत  होऊन समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन  ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुरेश  धोत्रे यांनी केले आहे.‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेचा जिल्हा मेळावा कृषी  वैभव लॉन मेहकर येथे १0 सप्टेंबर रोजी पार पडला. यावेळी  सुरेश धोत्रे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश धोत्रे हे हो ते. तर प्रमुख अतिथी म्हणून ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या  संघटनेचे सरचिटणीस संतोष मोहिते, प्रदेश संपर्क प्रमुख  सुधीर पवार, विदर्भ अध्यक्ष दिलीप चव्हाण आदी उपस्थित  होते. ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम, बुलडाणा,  औरंगाबाद, नांदेड, जालना आदी जिल्हय़ातील वडार  समाजबांधवांचा हा मेळावा आयोजित केला होता. यावेळी  वडार समाजाला आरक्षण मिळावे, जातीचे दाखले वेळेवर  मिळावे, गिट्टी खदानसाठी सरकारी जागा मिळावी, २00  ब्रासची रॉयल्टी मोफत मिळावी, आदी महत्त्वाच्या विषयावर  मेळाव्यात चर्चा करण्यात आली. यावेळी संतोष मोहिते,  सुधीर पवार, दिलीप चव्हाण आदी मान्यवरांनी भाषणे करून  समाज जागृतीसाठी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन नगर सेवक गणेशअण्णा लष्कर  यांनी केले होते. तर सूत्रसंचालन अशोक कुसळकर व  आभारप्रदर्शन प्रभाकर मुधोळकर यांनी केले. यावेळी रामेश्‍वर  पिटकर, अशोक मंजुळकर, रमेशअण्णा गायकवाड, शंकर  लष्कर, कैलास भांडेकर, अनिल मंजुळकर, संजय अत्तार,  माधव जेठे, रमेश लष्कर, राजू डुकरे, अशोक कुसळकर,  प्रभाकर मुधोळकर, लक्ष्मण कुसळकर, दिलीप गुंजकर,  गणेश मुधोळकर, दत्ता लष्कर, प्रमोद गुंजकर आदी कार्यकर्ते  व पदाधिकारी उपस्थित होते.