मोताळा: शहरातील बुलडाणा अर्बन शाखेत रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरय़ांनी चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मोताळा येथील बुलडाणा अर्बन बँक शाखेत रविवारी मध्य रात्री अज्ञात चोरट्यांनी बँकेचा समोरील दरवाजा मजबूत असल्यामुळे लगतची खिडकी तोडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र लोखंडी शटरचे कुलूप तोडल्यानतंर शटर उचकवून खिडकीची तावदाने फोडण्यापर्यंतच चोरांची मजल गेली. आतमध्ये चोरटे प्रवेश करू शकले नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान बँकेचे झाले नाही. हा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर घटनेची माहिती बोराखेडी पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ञांनासुद्धा पाचारण केले. मात्र यश आले नाही, बँक परिसरात एका कॅरी बॅग मध्ये मिरचीची पुड व दोन पायमोजे पथकाला आढळले. बँकेत लावलेल्या सीसी कॅमेर्याच्या फुटेजमध्ये कोणत्याही प्रकाराचे अज्ञात चोरांट्यांच्या हालचाली टिपल्या गेल्या नाहीत. त्यामुळे चोरट्यांनी बाहेरूनच पोबारा केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी बुलडाणा अर्बनचे शाखा व्यवस्थापक भागवत जगन्नाथ घिवे यांनी दिलेल्या तक्ररीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
बुलडाणा अर्बनची मोताळा शाखा फोडण्याचा प्रयत्न
By admin | Updated: June 16, 2014 22:48 IST