मलकापूर (जि. बुलडाणा): भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत युवक ठार झाला. ही घटना मलकापूर- बुलडाणा रस्त्यावर २६ नोव्हेंबर रोजी घडली. दाताळा ता.मलकापूर येथील रहिवासी रोहित रामभाऊ पाचपांडे (वय २२) हा दुचाकीने जात असताना त्याला मलकापूर ते बुलडाणा रस्त्यावर समोरुन येणार्या भरधाव ट्रकचालकाने धडक दिली. या धडकेत रोहित पाचपांडे हा जागीच ठार झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृतक हा आर्वी येथे पॉलिटेक्निकचा विद्यार्थी असून, वडील आजारी असल्याने वडिलांना भेटण्यासाठी दाताळा येथे आला होता.
ट्रकच्या धडकेत युवक ठार
By admin | Updated: November 27, 2015 01:45 IST