शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची दुचाकीला धडक; युवक जागीच ठार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:00 IST

खामगाव: भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडल्याने वाडी येथील युवक जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी तरोडा फाट्यानजीक घडली.

ठळक मुद्देघटना सोमवारी तरोडा फाट्यानजीक घडलीअकोल्याहून खामगावकडे येत होते

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडल्याने वाडी येथील युवक जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी तरोडा फाट्यानजीक घडली.वाडी येथील गोपाळ रामदास ठोकळ (२८) हा व त्याचा मित्र श्रीकृष्ण उत्तम भागवत हे सोमवारी दुचाकी क्र. एमएच २८ एव्ही ३0९५ ने अकोल्याहून खामगावकडे येत होते. दरम्यान, उपरोक्त ठिकाणी समोरील वाहनचालकाने अचानक ब्रेक लावले. त्यामुळे या मोटारसायकलस्वारांनीदेखील ब्रेक लावले. यावेळी मोटारसायकलचा तोल जाऊन गोपाळ ठोकळ हा रस्त्यावर पडला. दुर्दैवाने यावेळी समोरून वेगात येणार्‍या ट्रक क्र. जी.जे. १९ एक्स १५६४ ने गोपाळला चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने वाडी गावात हळहळ व्यक्त होत आहे.गोपाळ हा किराणा व्यावसायिक असल्याने गावात सर्वपरिचित होता. मनमिळावू स्वभावामुळे त्याचे गावात अनेक मित्र होते. सात महिन्यांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. त्याच्या अपघाती निधनाने ठोकळ परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सुखी संसाराचे स्वप्न पाहणार्‍या त्याच्या पत्नीवर तरुणपणात विधवा होण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. गोपाळच्या पार्थिर्वावर मंगळवारी सकाळी खामगाव येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. गोपाळच्या पश्‍चात आई-वडील,  एक भाऊ, एक बहीण व पत्नी असा आप्त परिवार आहे.