शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

ट्रकची अँपेला धडक; दोन ठार

By admin | Updated: June 14, 2014 23:45 IST

भाविकांच्या अँपेला भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकने धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

बुलडाणा : नवस पूर्ण करून तालुक्यातील वरवंड येथील नातेवाईकांच्या घरी जात असलेल्या भाविकांच्या अँपेला भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकने धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १२ जून रोजी रात्री १0 वाजेदरम्यान घडली. या अपघातात एक इंडिका कारही क्षतिग्रस्त झाली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, साखरखेर्डा पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या उमनगाव येथील खिल्लारे परिवाराचे सदस्य नवस पूर्ण करण्यासाठी एमएच-२८ एबी-१२९९ क्रमांकाच्या मालवाहू अँपेने बुलडाणा तालुक्यातील र्मदडी घाटातील देवीच्या मंदिरात गेले होते. नवस पूर्ण झाल्यानंतर सर्व खिल्लारे परिवार अँपेने बुलडाणा तालुक्यातील वरवंड येथील नातेवाईकांकडे रात्री मुक्कामासाठी निघाले; दरम्यान बुलडाणा-खामगाव मार्गावरील वरवंड फाट्याजवळील एका थाब्यावर पाणी पिण्यासाठी अँपे थांबविण्यात आला. यावेळी बुलडाणा येथून खामगावकडे १0 चाकाचे एमएमच-0४ टीआरएल-८२६ क्रमांकाच्या (चेचिस) ट्रकने फाट्याजवळ असलेल्या एमएच-२८ व्ही-७६८२ क्रमाकांच्या इंडिगो कारला मागून धडक दिली. या अपघातात इंडिगो कार रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेली. यावेळी अनियंत्रित झालेला ट्रक सरळ अँपेवर धडकला. यावेळी अँपेतून उतरणारे गौतम परमेश्‍वर खिल्लारे वय ९ व प्रकाश रामराव खिल्लारे वय ५५ यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी ट्रक चालक राहत मसीहा रहेमत मसीहा रा.जमशेदपूर याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. ** सैलानी जाणार्‍या गाडीचा अपघात; नऊ जण जखमीमेहकर : सैलानी बाबाच्या दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या वाहनाचा अपघात होऊन नऊ जण जखमी झाल्याची घटना १३ जून रोजी सकाळी १0 वाजताच्या सुमारास मेहकर-चिखली रस्त्यावरील नागझरीच्या उतारात घडली. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, जिंतूर जिल्ह्यातील येलदरी येथे एकत्र लग्नसोहळ्यासाठी काही मंडळी एम.एच.२२ एच.२३५६ क्रमांकाच्या वाहनाने आले होते; मात्र सर्वांनी बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा यांच्या दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला. हे सर्व जण सैलानीला जात असताना मेहकर-चिखली रस्त्यावर नागझरीच्या उतारात या भाविकांच्या वाहनचालकाने समोरुन जाणार्‍या महेंद्रा पिकअपला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला; दरम्यान महेंद्र पिकअपचा जोरदार धक्का भाविकांच्या वाहनाला लागला. त्यामध्ये वाहन चक्क तीन पलट्या घेऊन उताराच्या खड्डय़ात पडले. त्यात रवींद्र शंकर डिंगणे (५0), सुषमा रविंद्र डिंगणे (४२), ज्ञानेश्‍वर रविंद्र डिंगणे (१८), अख्तर युनूस मुलाणी (४0) सर्व रा.श्रीपूर जि.सोलापूर, मिलिंद थोरात, ऐश्‍वर्या गजानन जंत्रे (१८) रा.परळी, सुरेखा शिवाजी बारगजे (३५), राजेश्‍वर शिवाजी बारगजे सर्व रा.नेकनुर जि.बीड आदी जखमी झाले. आ.डॉ.संजय रायमुलकर हे त्याच रस्त्याने मेहकरकडे येत असताना त्यांनी या अपघातातील सर्व जखमींना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या जखमींपैकी वाहनचालक मिलिंद थोरात व रवींद्र डिंगणे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.