शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, वडिलांसह मुलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:37 IST

देऊळगाव राजा : भरधाव ट्रकने दुचाकीस जबर धडक दिल्याने वडिलांसह मुलीचा मृत्यू झाला़ ही घटना २५ सप्टेंबर राेजी ...

देऊळगाव राजा : भरधाव ट्रकने दुचाकीस जबर धडक दिल्याने वडिलांसह मुलीचा मृत्यू झाला़ ही घटना २५ सप्टेंबर राेजी देऊळगाव राजा शहराजवळील कुंभारी बायपास वळण रस्त्यावर घडली़ रामप्रसाद एकनाथ चेके व वैशाली गणेश मस्के अशी मृतांची नावे आहेत़

नारायणखेड येथील रामप्रसाद एकनाथ चेके व त्यांची विवाहित मुलगी वैशाली गणेश म्हस्के हे रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर दुचाकी क्रमांक एमएच २८ एएम ३१५३ ने गावाकडे जात हाेते़ दरम्यान, शहरातील बायपास वळण रस्ता कुंभारी जवळ त्यांच्या दुचाकीला ट्रक क्र.आरएल १४ जीएल १८७२ ने जबर धडक दिली़ यामध्ये वैशाली मस्के हिचा जागेवर मृत्यू झाला तर रामप्रसाद चेके हे गंभीर जखमी झाले हाेते़ त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले़ प्रकृती गंभीर असल्याने तेथून त्यांना जालना येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले़ परंतु त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ या प्रकरणी संतोष तुकाराम बनकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देऊळगावराजा पाेलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ पाेलिसांनी आराेपी चालकास ताब्यात घेतले आहे.

रुग्णवाहिका बनली शाेभेची वस्तू

अपघातानंतर उपस्थित ग्रामस्थांनी चेके यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवले़ प्रकृती गंभीर असल्याने डाॅक्टरांनी त्यांना जालना येथे नेण्याचा सल्ला दिला़ त्यांना जालना येथे नेण्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही़ त्यामुळे ही रुग्णवाहिका केवळ शाेभेची वस्तू असल्याचा आराेप नागरिकांनी केला़