शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

उरी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली

By admin | Updated: September 20, 2016 00:09 IST

चिखली येथे नवाज शरीफ यांचा पुतळा जाळला.

चिखली (जि. बुलडाणा), दि. १९: भारतात घुसखोरी करून काश्मीर येथील उरी लष्करी छवणीवर पाकिस्तानी घुसखोरांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले १७ जवानांना श्रद्धांजली वाहिण्यासाठी एकत्र आलेल्या कॉग्रेस कार्यकर्त्यांंनी १९ सप्टेंबर रोजी स्थानिक जयस्तंभ चौकात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा पुतळा जाळला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, नवाज शरीफ मुर्दाबाद अशा घोषणा देत उरी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. उरी सेक्टरमधील हल्ल्यात मुत्युमुखी पडलेल्या या शहिदांना श्रद्धाजंली वाहण्यासाठी चिखली कॉग्रेसच्यावतीने श्रद्धांजली देण्यात आली. श्रद्धांजली कार्यक्रम झाल्यावर जमा झालेल्या कार्यकर्त्यांंनी जयस्तंभ चौकात घोषणाबाजी करत नवाज शरीफ यांचा पुतळा जाळून तीव्र निषेध नोंदविला. यावेळी तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष विष्णू पाटील, शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, डॉ. सत्येंद्र भुसारी, पं.स.सभापती लक्ष्मणराव आंभोरे, उपसभापती दयानंद खरात, पप्पुसेठ हरलालका, प्रकाश बोंद्रे, कैलास खंदारे, अरविंद देशमुख, समाधान परिहार, साहेबराव पाटील, सुरेश बोंद्रे, गोकुळ शिंगणे, आशिष बोंद्रे, बंडू खरात, तुषार भावसार, डिगांबर देशमाने, काश्मीर चोपडा आदी उपस्थित होते.