शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अप्रशिक्षीत डॉक्टराकडून होतो उपचार

By admin | Updated: July 12, 2014 00:15 IST

बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात डॉक्टरांची २0 पदे रिक्त

बुलडाणा: जल व किटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असताना बुलडाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्या विभागात डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणा वार्‍यावर असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात अनेक आरोग्य कें द्रांत अप्रशिक्षीत डॉक्टरांकडून उपचार होते असल्याची धक्कादायक माहिती आहे.बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यात एकून ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गट-अ ची एकूण ११८ पदे मंजूर आहेत. मात्र गट-अची आतापर्यंत केवळ ९८ पदे भरण्यात आली आहेत. तर जवळपास २0 वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदामुळे त्या परिसरातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर झाली आहे. डॉक्टर नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांना आरोग्याच्या सुविधा मिळत नाही. शासनाने कोट्यावधी रूपये खर्च करून सुसज्ज ईमारती उभ्या केल्या आहेत. त्यासाठी लागणारा औषधीसाठा, याशिवाय कर्मचारी, रूग्णवाहिका, ही सर्व सुविधा उपलब्ध असताना केवळ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागातील नागरीकांना आरोग्याच्या पुरेशा सुविधा मिळत नाहीत. सद्यस्थितीत पाऊस नसला तरी मागील महिनाभरात वातावरणतील बदलामुळे व दुषीत पाण्यामुळे धाड, रायपूर, सातगाव व अन्य काही गावात सा थीच्या रोगाची लागण झाली होती. पावसाळ्यात साथ रोग आटोक्यात आणण्याची सगळी भिस्त आरोग्य विभागावर असते. मात्र ज्या प्राथमिक आरोग्या केंद्रावर वैद्यकीय अधिकारीच नाही, त्या परिसरातील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट होत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी शासनानकडे वेळोवेळी पाठपुराव करण्यात आला असल्याचे सांगीतले. लवकरच रिक्त असलेली पदे भरण्यात येतील. पावसाळ्यात साथ रोगाची लागण होऊ नये म्हणून आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगीतले. *अप्रशिक्षीत अधिकारी करतात उपचार ज्या आरोग्या केंद्रात कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे भरलेले नाहीत, अशा अनेक ठिकाणी अप्रशीक्षीत कर्मचारी काम करतात. हा प्रकार म्हणजे रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. रुग्णालयातील आरोग्य सहाय्यक, चतुर्थश्रेणी कर्मचारी व वेळप्रसंगी आरोग्य केंद्रातील सफाई कामगारही रुग्णाला सलाईन लावण्याचे व इंजक्शन देण्याचे काम करतात. हा प्रकार अनेक आरोग्य केंद्रात सुरू असतो. तर काही आरोग्य केंद्रात आयुर्वेदीक डॉक्टर सेवा देतात. आयुर्वेदीक डॉक्टरांना अँलोपॅथीची प्रॅक्टीस करता येत नाही, असे असताना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हे डॉक्टर प्रॅक्टीस करीत आहेत.