शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पशुसंवर्धन दवाखान्यात परिचारकाकडून गुरांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:23 IST

अमडापूर : स्थानिक पशुसंवर्धन दवाखान्यात कायमस्वरूपी  पशुसंवर्धन अधिकारी नसल्यामुळे परिचारकाकडून गुरां-ढोरांवर  उपचार करण्यात येत आहेत. याची दखल घेऊन वरिष्ठ  अधिकार्‍यांनी अमडापूर येथील पशुसंवर्धन दवाखान्यात  कायमस्वरूपी पशुसंवर्धन अधिकार्‍याची नियुक्ती करावी, अशी  मागणी होत आहे.

ठळक मुद्देकायमस्वरूपी पशुसंवर्धन अधिकारी देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर : स्थानिक पशुसंवर्धन दवाखान्यात कायमस्वरूपी  पशुसंवर्धन अधिकारी नसल्यामुळे परिचारकाकडून गुरां-ढोरांवर  उपचार करण्यात येत आहेत. याची दखल घेऊन वरिष्ठ  अधिकार्‍यांनी अमडापूर येथील पशुसंवर्धन दवाखान्यात  कायमस्वरूपी पशुसंवर्धन अधिकार्‍याची नियुक्ती करावी, अशी  मागणी होत आहे.अमडापूरसह १६ गावातील शेतकर्‍याच्या आजारी गुरा-ढोरांवर  औषध उपचार करण्यासाठी शासनाने इमारत बांधून याठिकाणी  पशुसंवर्धन अधिकार्‍याची नियुक्ती केलेली होती; मात्र नियुक्त  पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सदाशिवन हे ३0 जून रोजी सेवानवृत्त  झाले आहेत. तेव्हापासून या पशुसंवर्धन दवाखान्याला डॉक्टर न  मिळाल्याने येथील कार्यरत परिचारक हे गुरा-ढोरांवर औषधो पचार करीत असल्याचे दिसत आहे. या ठिकाणी डॉक्टर नसल्याने उंद्री येथे कार्यरत असलेले डॉ.शु क्ला हे बुधवार व शुक्रवार दोन दिवस काम पाहत असून, इतर  दिवशी मात्र परिचारकच पशुसंवर्धन दवाखाण्याची जबाबदारी  पार पाडीत आहेत, त्यामुळे या दवाखान्याला पशुसंवर्धन  अधिकारी कायमस्वरूपी देण्याची गरज आहे.चिखली तालुक्यात असलेल्या अमडापूरसह १६ गावातील शे तकरीवर्ग त्यांचे आजारी असलेले गुरे-ढोरे या पशुसंवर्धन  दवाखाण्यामध्ये उपचारासाठी घेऊन येतात; मात्र या ठिकाणी  गेल्या तीन महिन्यापासून कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने या  आजारी गुरा-ढोरांवर येथील कार्यरत परिचारक हे उपचार करीत  आहे. त्यामुळे अनेक वेळा गुरांवर जीव गमावण्याची वेळ आली  आहे. या दवाखान्या व्यक्तिरिक्त परिसरात कोणताच दुसरा  दवाखाना नसल्यामुळे पशुपालक अडचणीत आले आहेत. या  उपचारादरम्यान ज्याची जबाबदारी आहे, तेच याठिकाणी  नसल्याने या परिचारकांनी केलेल्या औषध उपचारावर प्रश्नचिन्ह  निर्माण होत आहे. तर या ठिकाणी दोन दिवसासाठी उंद्री येथून  येणारे डॉ.शुक्ला हे सुद्धा तात्पुरते असल्याने या पशुसंवर्धन  दवाखाण्याचा कारभार परिचारकच पाहत आहेत. यासाठी  शासनाने कायमस्वरूपी पशुसंवर्धन अधिकारी द्यावा, अशी शे तकर्‍यांकडून मागणी होत आहे.  

डॉ.मोरे ए.डी.ओ.यांचे आदेशाने तात्पुरते बुधवार व शुक्रवार हे  दोन दिवस मी उंद्री येथे कार्यरत असताना मला पाहावे लागते व  इतर दिवशी परिचारकच काम पाहतात.- डॉ.जी.एस.शुक्लापशुधन पर्यवेक्षक, उंद्री.