शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे पथसंचलन

By admin | Updated: September 1, 2014 22:25 IST

गणेशोत्सव कालावधीत गणेश स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत सर्व कार्यक्रम शांततेत व्हावेत, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.

चिखली : शहरात गणेशोत्सव कालावधीत गणेश स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत सर्व कार्यक्रम शांततेत व्हावेत, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान पोलिसांनी घालून दिलेल्या अटी व बंधनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावे व कायद्याचे पालन करून गणेशोत्सव शांततेत व आनंदाने साजरा करावा, असे आवाहन ठाणेदार व्ही.एच.राजपूत यांनी केले आहे.२७ ऑगस्ट रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक शामराव दिघावकर, अपर पोलिस अधिक्षक ङ्म्रीमती श्‍वेता खेडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी समीर शेख, आमदार राहुल बोंद्रे, ठाणेदार व्ही.एच.राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, शांतता कमिटी सदस्य व पत्रकार यांची बैठक पार पडली. तर २८ ऑगस्ट रोजी तहसीलदार राजेश्‍वर हांडे, उपविभागीय पोलिस अधिकारी समीर शेख, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, अभियंता बोरसे, ठाणेदार राजपूत यांनी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन मार्गदर्शन केले तसेच विसर्जन मार्गाची पाहणी केली आहे. याशिवाय चिखली पोलिस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार, निगरानी बदमाश, व इतर गुन्ह्यातील १0९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर गतवर्षी जय गणेश मंडळाची चांदीची गणेश मूर्ती चोरणार्‍या आरोपींपैकी दोघांविरूध्द कलम १५१ (३) जाफौ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांची बुलडाणा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. इतर १0 सराईत गुन्हेगारांवर कलम १४४ (२) जाफौ प्रमाणे कारवाई करण्यात आली असून गणेशोत्सव काळात पोलिस स्टेशनच्या हद्दीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. अवैध दारू विक्री करणार्‍या सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली असून करण्यात आली आहे.