शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कंत्राटदारावरील कारवाई थंड बस्त्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:01 IST

शेगाव :   रेशनचा माल दुकानांपर्यंत न पोहचविता थेट काळ्या  बाजारात विक्री होत असल्याच्या घटना  जानेवारी महिन्यात  शेगाव येथे उघडकीस आल्या. दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांनी  चौकशीअंती वाहतूक कंत्राटदारावर तत्काळ पोलिसात तक्रार  देऊन गुन्हा नोंदविण्यात यावा, असे आदेश दिलेले असताना या  आदेशाला शेगाव पुरवठा विभागाकडून केराची टोपली  दाखविल्या जात असल्याची बाब समोर येत आहे. 

ठळक मुद्देजिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला पुरवठा विभागाकडून केराची टोपली पुरवठा अधिकारी वट्टे यांच्यावर जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव :   रेशनचा माल दुकानांपर्यंत न पोहचविता थेट काळ्या  बाजारात विक्री होत असल्याच्या घटना  जानेवारी महिन्यात  शेगाव येथे उघडकीस आल्या. दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांनी  चौकशीअंती वाहतूक कंत्राटदारावर तत्काळ पोलिसात तक्रार  देऊन गुन्हा नोंदविण्यात यावा, असे आदेश दिलेले असताना या  आदेशाला शेगाव पुरवठा विभागाकडून केराची टोपली  दाखविल्या जात असल्याची बाब समोर येत आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात द्वारपोच  योजनेत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचे उघडकीस आलेले  आहे. यामध्ये शेगाव शहरातील रेशनच्या मालाची अफरातफर  अनेक वेळा उघडकीस आली आहे. मागील २५ जानेवारीला  द्वारपोच योजनेंतर्गत रेशन धान्याचे ३५0 कट्टे तांदूळ व गहू  संबंधित रेशन दुकानावर न पोहोचविता शेगाव येथील एक  गोदामावर उतरविण्यात आला.  पुरवठा विभागाने या ठिकाणी  धाड टाकून सदर माल ताब्यात घेतला व या प्रकरणी इतर रेशन  माफियांना सोडून फक्त रेशन दुकानदार गजानन हरिभाऊ नीले  यांना बळीचा बकरा बनवून त्यांच्यावरच ठाण्यात गुन्हा दाखल  करण्यात आला होता.वास्तविक पाहता आपल्या करारनाम्याचा भंग केल्यामुळे वाह तूक ठेकेदारावरसुद्धा गुन्हा दाखल होणे गरजेचे होते. याप्रकरणी  तत्कालीन जिल्हाधिकारी झाडे यांच्याकडे तक्रार झाल्यानंतर  त्यांनी याची चौकशी लावली. त्यामध्ये आदेश दिले की,  अप्पर जिल्हाधिकारी, बुलडाणा यांनी  आपल्या अहवालात वाहतूक कंत्राटदार श्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनी  अमरावतीने शासनासोबत केलेल्या  करारनाम्यातील अटी व श र्तीचा भंग केला असून, दोषी असल्याचे नमूद केले आहे. 

पुरवठा अधिकारी वट्टे यांच्यावर जबाबदारीआठवडाभराचा कालावधी उलटला तरीही अद्याप पावेतो  जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही.  त्यामुळे कंत्राटदारासोबत साठगाठ केल्या गेल्यावर तर गुन्हा  दाखल करण्यात येणार नाही ना, अशी शंका नागरिक उपस्थित  करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी खामगावचे  पुरवठा अधिकारी वट्टे यांच्याकडे देण्यात आली आहे; मात्र  बुधवारी रात्रीपर्यंत हे अधिकारी पोलीस स्टेशनला पोहचलेले  नव्हते. या बाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता काही  कामानिमित्त बाहेर जावे लागत असल्यामुळे गुन्हा दाखल करता  आला नसल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.