शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

राहेरीच्या पुलावरून वाहतुकीस बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 12:03 IST

Bridge on Purna River पूर्णा नदीवरील पुलाची भारवाहन क्षमता संपल्याने हा पूल अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे.

ठळक मुद्देराहेरी येथील हा पूल १९७१-७२ मध्ये बांधण्यात आला हाेता.जड वाहतुकीमुळे पूल कमकुवत होत गेला.

  लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : तालुक्यातील राहेरी बु. येथील पूर्णा नदीवरील पुलाची भारवाहन क्षमता संपल्याने हा पूल अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येत असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने सिनियर इंजिनियर सुरेश कसबे यांनी दिली आहे.राहेरी येथील हा पूल १९७१-७२ मध्ये बांधण्यात आला हाेता. दरम्यान, गेल्या काही वर्षांत या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. जड वाहतुकीमुळे पूल कमकुवत होत गेला.  २०१८ मध्ये बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी या पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करून पूल कमकुवत झाल्याचे निदर्शनास आणून दिले होते. याच दरम्यान, जालना, बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी एक नोटिफिकेशन जारी करून या मार्गावरील सर्वप्रकारची जड वाहतूक बंद केली होती. वाहतूक बंद करताना जालन्याकडून येणारी जड वाहतूक देऊळगाव राजा, चिखलीमार्गे मेहकर किंवा खामगावमार्गे अमरावती, नागपूरकडे वळविण्यात आली होती. परंतु पुलाची सक्षम अभियांत्याकडून डागडुजी करण्यात आल्यानंतर हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला झाला.अर्थात प्रशासनाच्या लेखी हा पूल वाहतुकीसाठी बंद होता, पण वाहतूक मात्र जोरात सुरू होती. हा राज्यमार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे ऑक्टाेबर २०१९ मध्ये हस्तांतरित झाल्यानंतर जुलै २०२०मध्ये या पुलावरील जड वाहतूक बंद करण्यासंदर्भात एक पत्र जालना, बुलडाणा व अकोला जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले होते.  परंतु सहा महिने होऊनही वाहतूक बंद करण्यात आली नव्हती.

पालकमंत्र्यांच्या सूचनेने यंत्रणा सज्जपालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी रविवारी या पुलाची पाहणी केली असता पुलाची दुरवस्था त्यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण इंजिनियर सुरेश कसबे यांना वाहतूक सक्तीने बंद करण्याच्या सूचना दिल्या. या पुलावरून वाहतूक अशीच सुरू राहिल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही ही बाब गंभीर असून, जड वाहतूक बंद करण्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांनीही सूचित केले आहे. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या सूचना येताच जालना व बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी संयुक्तपणे वाहतूक बंद करण्याबाबत पोलीस यंत्रणेला सुचविले असल्याने तत्काळ प्रभावाने जड, अवजड वाहतुकीसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSindkhed Rajaसिंदखेड राजा