शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बाजारातील टीन शेडवर व्यापाऱ्यांचा कब्जा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 15:17 IST

व्यापाºयांच्या मालाचे पोते ठेवण्यात आले असून शेतकºयांना त्यांचा शेतमाल हर्रासीत मांडण्यासाठी फारच कमी जागा शिल्लक ठेवण्यात आली आहे.

- देवेंद्र ठाकरे लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: तालुक्यातील आसलगाव येथील बाजारात शेतकऱ्यांच्या शेतमालाची हर्रासी करण्यासाठी मोठे टीन शेड उभारण्यात आले आहेत. परंतु याचा वापर प्रत्यक्ष व्यापारीच करीत असल्याचे दिसून येते. सर्वत्र व्यापाºयांच्या मालाचे पोते ठेवण्यात आले असून शेतकºयांना त्यांचा शेतमाल हर्रासीत मांडण्यासाठी फारच कमी जागा शिल्लक ठेवण्यात आली आहे. ही बाब लोकमत स्टींग आॅपरेशनमधून समोर आली आहे.जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत आसलगाव उपबाजार आहे. जळगाव जामोद तालुक्यात आसलगाव येथे दर मंगळवारी मोठा बाजार भरतो. तालुक्यात आसलगावचा बाजार धान्य व गुरांच्या बाजारासाठी प्रसिध्द आहे. तालुक्यातून तसेच तालुक्याबाहेरूनही शेतकरी येथे शेतमाल विक्रीसाठी आणतात. परंतु या बाजारात शेतकºयांना त्रास होत असल्याचे दिसून आहे. विशेष म्हणजे खरीप हंगामातील पिकांची काढणी आल्यानंतर या बाजारात प्रचंड गर्दी होते. बाजाराच्या दिवशी गर्दी असल्याने वाहनांची मोठी रांग या परिसरात लागते. हजारो क्विंटल शेतमाल दर मंगळवारी बाजारात येतो. यावर्षी परतीचा पाऊस लांबल्याने सोयाबीन, मका, ज्वारी पिकांची काढणीही लांबली.सध्या मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, मका, ज्वारी, उडीद, मुग बाजारात येत आहे. परंतु शेतकºयांच्या शेतमालाची हर्रासी करण्यासाठी बांधण्यात आलेल्या टीन शेडमध्ये शेतकºयांऐवजी व्यापाºयांचाच माल जास्त आहे. हर्रासीसाठी शेतकºयांना शेतमाल ठेवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गत मंगळवारी आसलगाव बाजारात प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यात आली. यावेळी टीनशेडमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापाºयांचा शेतमाल ठेवण्यात आल्याचे दिसून आले. टीन शेडमधील सुमारे ७५ टक्के जागा व्यापाºयांनी साठा केलेल्या पोत्यांनी व्यापलेली दिसून आली.पुर्वेकडील शेवटच्या टीनशेड मध्ये शेतकºयांसाठी जागा शिल्लक असल्याचे दिसून आले. अनेक शेतकºयांना आपला माल टीन शेडच्या बाहेरच ठेवून हर्रासी करावी लागली.दरम्यान याकडे बाजार समिती प्रशासनाने लक्ष देऊन शेतकºयांसाठी शेतकºयांना त्रास होऊ नये, यासाठी टीन शेडमध्ये मोकळी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.माल टीनशेड बाहेर ठेवून हर्रासीजळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत आसलगाव उपबाजारातील टीनशेडमध्ये व्यापाºयांनी पोत्यांची रांग लावून मोठी जागा व्यापली, अशी माहिती ‘लोकमत’ प्रतिनिधीला मिळाली. यानंतर मंगळवार १९ नोव्हेंबर रोजी बाजारात प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यात आली. यावेळी टीनशेडमधील सुमारे ७५ टक्के जागेवर व्यापाºयांच्याच शेतमालाच्या पोत्यांची रांग दिसून आली. शेतकºयांना त्यांचा माल टीनशेडमध्ये ठेवताना मोठी कसरत करावी लागल्याचे दिसून आले. अनेक शेतकºयांना त्यांचा माल टीनशेड बाहेर ठेवून हर्रासी करावी लागल्याचेही दिसून आले.

एक टीन शेड शेतकºयांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. मंगळवारी स्वत: जाऊन परिस्थितीची पाहणी केली, ज्या व्यापाºयांचा माल तिथे होता, त्यांना दंड आकारण्यात येणार आहे. भविष्यातही अशी परिस्थिती उद्भवल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.-प्रसेनजित पाटीलसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जामोद.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती