शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

संतनगरीत सुट्यांमुळे पर्यटकांची मांदियाळी

By admin | Updated: May 20, 2017 00:50 IST

शेगाव : विदर्भाची पंढरी शेगाव श्री गजानन महाराजांच्या पुनित वास्तव्याने अगणित लाखो भक्तांचे आकर्षण केंद्र बनली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : विदर्भाची पंढरी शेगाव श्री गजानन महाराजांच्या पुनित वास्तव्याने अगणित लाखो भक्तांचे आकर्षण केंद्र बनली आहे. संस्थानला आनंद सागर अध्यात्मिक केंद्र मनोहारी उद्यान या प्रकल्पाने तर संतनगरी शेगावचे नाव तर जगाच्या नकाशावर झळकले आहे. सुट्टीच्या काळामध्ये आनंद सागर पीकनिक पॉर्इंट बनला आहे. या सुटींच्या कालावधीत तर प्रती दिवसाला हजाराच्या वर भक्तगण आनंद सागरचा आनंद लुटतात. आनंद सागरमध्ये लहान मुलांचे विशेष खेळणी विभाग आहेत. मत्सालय तर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. विविध जातीच्या, विविध रंगाच्या प्रकाराच्या मासोळ्या पर्यटकांना विशेष आकर्षित करतात. पर्यटकांना कॉफी हाऊस नास्त्यासाठी उपहारगृह, भोजनालय आदींची सुनियोजनपूर्वक आनंद सागरात उपलब्ध आहेत. यामध्ये श्री शिवशंकर मंदिर, श्री नवग्रह मंदिराची मोठ्या आकर्षकरीत्या संगमवरवरी पांढऱ्या शुभ्र मार्बलमध्ये बांधणी केलेली आहे.पर्यटकांनी आनंदसागरचे अवलोकन केल्यानंतर शेवटी जाता जाता संगीताच्या तालावर भक्तीसंगीताच्या निनादात लयबद्ध पाण्याचे उंच उंच विविध रंगाने नटलेले फवारे पाहताना तर भक्तगण भक्तीरसात तल्लीन होतात.आनंद सागरला भक्तांच्या सेवेत तब्बल १४ वर्षे झालेले आहेत. ९ फेब्रुवारी २००३ ला लोकार्पण झाले. प्रतिदिन ७ ते १० हजार भक्तगण या मनोहारी उद्यानाचे अवलोकन करतात. परीक्षेनंतरच्या सुट्या, नाताळच्या दिवाळीच्या सुट्यांमध्ये भक्तांची मांदियाळी संतनगरीत, आनंद सागरात दिवसेंदिवस वाढत आहे. १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत अवलोकन करणारे भक्त हे पंचवीस लाख होते, हे विशेष.