शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुष्ठरोग जनजागृतीसाठी ‘स्पर्श’ मोहीम

By admin | Updated: January 22, 2017 02:58 IST

बुलडाणा जिल्ह्यात ३0 जानेवारी ते १३ फेब्रुवारी हा कुष्ठरोग निवारण पंधरवडा साजरा होणार.

बुलडाणा, दि. २१- दरवर्षी ३0 जानेवारी हा कुष्ठरोग निवारण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त ३0 जानेवारी ते १३ फेब्रुवारी हा कुष्ठरोग निवारण पंधरवडा साजरा करण्यात येतो. मात्र, या वर्षात कुष्ठरोगाचे बाहेर न आलेले रुग्ण शोधण्यासाठी आणि रोगाविषयी जनजागृती करण्यासाठी स्पर्श मोहीम राबविण्यात येणार आहे.याविषयी जिल्हास्तरीय कुष्ठरोग समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आरोग्य सेवा सहायक संचालक डॉ.के.एस. वासनिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, ३0 जानेवारी रोजी विशेष ग्रामसभेच्या आयोजनात या रोगाविषयी माहिती द्यावी. तसेच रुग्णांना उपचाराविषयी मार्गदर्शन करावे. तसेच जिल्हाधिकार्‍यांच्या संदेशाचे वाचन करून सरपंचांना मनोगत व्यक्त करायला लावायचे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असल्यामुळे सर्वांना कुष्ठरोग निवारणाची शपथ द्यावी. सर्व शाळा, आश्रम शाळा, कार्यालयातसुद्धा शपथ देण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिल्या. याप्रसंगी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. स्पर्श मोहिमेदरम्यान शासनाच्यावतीने नेमणूक करण्यात आलेले अधिकारी कुष्ठरोग्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कुष्ठरोग झाल्यानंतर अनेकजण याबाबत कुठेही वाच्यता करीत नाहीत. त्यामुळे या रोगांचा संसर्ग वाढतच जातो. या रोग्यांचा शोध आता स्पर्श मोहिमेदरम्यान घेण्यात येणार आहे.