शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मोताळा तालुक्यात तूर खरेदी बंदच!

By admin | Updated: May 14, 2017 04:05 IST

शासनाची घोषणा फोल; आ. सपकाळ यांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट.

धामणगाव बढे : हमी भावाने तूर खरेदीसाठी शासनाने मुदतवाढ दिली असली, तरी मोताळा तालुक्यात तूर खरेदीसाठी संबंधितांना परवानगी न मिळाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तूर खरेदीसाठी मुदतवाढ मिळाल्यानंतर शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. तातडीने तूर खरेदी केंद्र सुरू होतील, अशी शेतकर्यांना अपेक्षा होती. मात्र मोताळा तालुक्यातील पिंपळगाव देवी केंद्रावरील २२ एप्रिल रोजी पंचनामा झालेला शेतमाल मागील दोन दिवसांपासून मोजणे सुरू आहे, तर नवीन माल खरेदी करण्याची परवानगी नसल्यामुळे शेतकरी प्रतीक्षेत आहेत.जिल्ह्यात खरेदी- विक्री संघाच्या माध्यमातून नाफेड तूर खरेदी करीत आहे. मात्र, मोताळा तालुक्यात खरेदी-विक्री संघ अस्तित्वात नाही. त्यामुळे अडचण निर्माण होत आहे. मोताळा कृषी उत्पन्न बाजार समितीने जिल्हा खरेदी-विक्री संघांतर्गत तूर खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. तसा प्रस्ताव त्यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा व संबंधितांना पाठविला आहे. आ.हर्षवर्धन सपकाळ यांनी मोताळा तालुक्यातील तूर खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी बुलडाणा यांची १२ मे रोजी भेट घेतली, तर जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांनी मोताळा तालुक्यासाठीचा तूर खरेदीचा प्रस्ताव दिल्ली येथे पाठविला असल्याचे सांगितले. मोताळा तालुक्यात शेतकर्यांकडे शेकडो क्विंटल तूर घरात पडून आहे. बाजारात पडलेल्या तुरीच्या भावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तूर खरेदीस मान्यता मिळाल्यास लाल माती येथील केंद्र सुरू होण्याची शक्यता नाही. तेथील केंद्र खासगी जागेत सुरू होते व संबंधित व्यक्तीने जागा देण्यास असर्मथता दर्शविली. त्यामुळे मोताळा येथे खरेदी केंद्र सुरू करावे लागेल.आधी पंचनामा करुन पडलेली तूर मोजून घेणेबाबत जिल्हाधिकार्यांशी चर्चा केली. त्या अनुषंगाने ती तूर खरेदीस प्रारंभ झाला. तसेच मुदतवाढीनंतर सुद्धा फक्त घोषणा करुन तूर खरेदीची शासनाची मानसिकता नाही. शेतकर्यांच्या घरात पडलेली तूर शासनास खरेदी करण्यास बाध्य करू. भा.रा.काँग्रेस पक्ष शेतकर्यांना वार्यावर सोडणार नाही.- आ. हर्षवर्धन सपकाळ, बुलडाणा