शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

‘श्रीं’चा उद्या पुण्यतिथी सोहळा

By admin | Updated: September 5, 2016 00:59 IST

शेगावात ९५ दिंड्यांचे आगमन, पुण्यतिथी सोहळय़ाची तयारी पुर्ण.

शेगाव (जि.बुलडाणा), दि. ४ : श्री संत गजानन महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव ६ सप्टेंबर रोजी येथे भाविकांच्या मांदियाळीत साजरा होणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने संस्थानने जय्यत तयारी पूर्ण केली आहे. ४ सप्टेंबरपर्यंंत ९५ दिंड्यांचे आगमन शेगाव येथे झाले आहे.शेगाव येथे श्री संत गजानन महाराज पुण्यतिथी सोहळय़ाला श्री गणेश याग व वरुण यागाने शुक्रवारी प्रारंभ झाला. या सोहळ्य़ातील मुख्य पुण्यतिथी कार्यक्रम ६ सप्टेंबर रोजी होणार असून सकाळी १0 वाजता यागाची पूर्णाहुती व अवभृतस्नान होईल. यावेळी संस्थानचे विश्‍वस्त यांची उपस्थिती राहील. तसेच कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या उपस्थितीत पूर्णाहुती कार्यक्रम पार पडणार आहे. दु.२ वाजता श्रींच्या रजत मुखवट्याचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतरह्यश्रींह्णची पालखी रथ, मेणा, गज अश्‍वासह नगर परिक्रमेसाठी निघणार आहे. श्रींच्या उत्सवासाठी ४ सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत ९५ दिंड्यांचे आगमन झाले आहे. यापैकी नियमांची पूर्तता करणार्‍या ४२ दिंड्यांना भजनी सािहत्याचे वाटप करण्यात आले आहे.श्रींच्या मंदिरात गर्दी लक्षात घेता भक्तांच्या पादत्राणे ठेवण्याची वेगळी व्यवस्था संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे तसेच नागपूर येथील श्री गजानन भक्त मंडळाने मंदिरासमोर पादत्राणे ठेवण्यासासाठी विनामूल्य व्यवस्थासुद्धा आहे. श्री गजानन भक्तांसाठी श्री अग्रसेन भवन येथे ५ व ६ सप्टेंबर असे दोन दिवस महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. मंदिरात दर्शनासाठी एकेरी मार्गाची व्यवस्था केली आहे. दर्शन लवकर व्हावे यासाठी श्रींच्या भक्तांना श्रींचे कळसदर्शन, मुख्य दर्शन व समाधी दर्शन घेता येणार आहे. भक्तांच्या सेवेसाठी कर्मचारी, सेवाधारी वर्ग तत्पर आहेत. असा राहील नगर परिक्रमेचा मार्गश्री गजानन महाराज मंदिरातून ढोलपुरी गेट, श्री गजानन चित्र मंदिर, जुने महादेव मंदिर, शीतलनाथ महाराज धर्मशाळा, माळीपुरा, प्रगटस्थळ येथे श्रीची प्रगटस्थळी पूजा व त्यानंतर. गढीजवळून डॉ. तायडे यांचा दवाखाना, बाजार रोडने बसस्टँड, मुख्य रोडवरून शिवाजी चौक, गांधी चौक, डॉ. आंबेडकर चौक, भक्तनिवास येथून श्रींच्या मंदिरात संध्याकाळी दाखल होईल व या ठिकाणी संस्थानच्या वतीने श्रींची आरती होईल.