शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयांची उद्दिष्टपूर्ती ४८ टक्क्यांवरच!

By admin | Updated: May 15, 2017 00:30 IST

मलकापूर : राज्य शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानास मुदतवाढ देण्यात आल्यावरही मलकापूर नगरपालिका अखत्यारित शौचालयांची उद्दिष्टपूर्ती सुमारे ४८ टक्क्यांवरच थांबल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : राज्य शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानास मुदतवाढ देण्यात आल्यावरही मलकापूर नगरपालिका अखत्यारित शौचालयांची उद्दिष्टपूर्ती सुमारे ४८ टक्क्यांवरच थांबल्याची माहिती असून, हगणदरीमुक्तीसाठी शासन एकीकडे गंभीर असताना त्या उद्देशास स्थानीय पालिकेत खो बसण्याची भीती व्यक्त होताना दिसते.सन २०१६-१७ या वर्षात राज्यभरातील महापालिका व नगरपालिकांना ठरावीक उद्दिष्ट देण्यात आली आहेत. मलकापूर नगरपालिकेला ३ हजार २७१ एवढ्या शौचालयाच्या निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती आहे. यासाठी पालिकेने ४ हजार अर्जांचे वाटप केले. त्यापैकी २ हजार ७०० इतक्या नागरिकांनी शौचालयासाठी अर्ज केले आहेत. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत विशिष्ट अनुदानाची तरतूद शासनाच्यावतीने करण्यात आली आहे. ३१ मार्च २०१७ या मुदतीत शौचालयांची निर्मिती अपेक्षित होती. मात्र, तसे झाले नाही. त्या धर्तीवर मुदतवाढ शासनाने दिल्याची माहिती आहे. असे असताना स्थानिक नगरपालिका अखत्यारित आरोग्य विभागाला त्यांच्याकडे प्राप्त २ हजार ७०० इतक्या अर्जांपैकी १ हजार ३०० इतकीच शौचालये निर्माण करता आल्याने एकूण उद्दिष्टांपैकी सुमारे ४८ टक्केच उद्दिष्ट पूर्ण करण्यात यश आल्याचे सूत्रांनी सांगितले. स्थानिक पालिकेला ३ हजार २७१ शौचालयांचे उद्दिष्ट आहे; अर्थात आरोग्य विभागाचे उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत. याखेरीज वैयक्तिक शौचालयाखेरीज सार्वजनिक शौचालयांसाठी जागा शोधणे, त्यावर शौचालयांची निर्मिती करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहिती असून, उर्वरित काम प्रगतीपथावर असल्याचे सांगितले जाते. हगणदरीमुक्तीसाठी शौचालयाची निर्मिती व्हावी, याकरिता प्रामाणिक प्रयत्न आहे. अर्थात त्यात विविध अडचणींचा सामना करावा लागला. तरीदेखील शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करुन स्वच्छ महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.- पराग रुढे आरोग्य निरीक्षक, न.प. मलकापूर