शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

आज ‘श्रीं’चा १0६ वा पुण्यतिथी महोत्सव

By admin | Updated: September 6, 2016 02:06 IST

सोमवारी रात्री उशिरापर्यंंत एकूण ३५८ भजनी दिंड्याचे आगमन शेगावात झाले.

शेगाव (जि. बुलडाणा), दि. ५ : श्री गजानन महाराजांचा १0६ वा पुण्यतिथी उत्सव मंगळवारी विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. यानिमित्त मोठय़ा संख्येने भाविक सोमवारीच शेगावात दाखल झाले आहेत. पुण्यतिथीदिनी हभप विष्णूबुवा कव्हळेकर यांचे सकाळी ७ ते ९ वाजे दरम्यान श्रींचे समाधी सोहळ्यानिमित्त कीर्तन होईल. त्यानंतर सकाळी १0 वाजता यागाची पूर्णाहूती व दु. २ वा. श्रींच्या पालखीची नगरपरिक्रमा सुरु होणार आहे. या उत्सवाच्या अनुषंगाने सोमवारी रात्री उशिरापर्यंंंत एकूण ३५८ भजनी दिंड्याचे आगमन शेगावात झाले, तर एकूण ५00 दिंड्यांचे आगमन पुण्यतिथी दिनानिमित्त होणार आहे. यामध्ये ६0 भजनी दिंड्या नवीन आहेत. नियमाची पूर्तता करणार्‍या भजनी दिंड्यांना भजनी साहित्य वाटप करण्यात येत आहे.बुधवारी हभप जगन्नाथ बुवा म्हस्के मुंबई यांचे सकाळी ६ ते ७ काल्याचे कीर्तन होईल. यानंतर दहीहंडी व गोपाळकाला होईल. उत्सवानिमित्त भक्तांची गर्दी लक्षात घेता संस्थानच्यावतीने सर्व सोयीची व्यवस्था केली असून सेवाधारी आपली सेवा देत आहेत. श्रींच्या मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शेगाव पोलीस स्टेशनच्यावतीने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.