शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

आज जिल्ह्यात गणरायाला निरोप

By admin | Updated: September 15, 2016 01:59 IST

बुलडाणा जिल्ह्यात ६३५ सार्वजनिक गणेश मंडळ; ढोल-ताशांच्या गजरात निघणार मिरवणूक.

बुलडाणा, दि. १४ - जिल्ह्यात गत दहा दिवसांपूर्वी मोठय़ा हर्षोल्हासात स्थापन झालेल्या गणरायाला गुरुवारी निरोप देण्यात येणार आहे. विविध गणेश मंडळे ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला निरोप देणार आहेत. गणेश विसर्जनाकरिता कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात ५ सप्टेंबर रोजी विविध गणेश मंडळे तसेच घरोघरी गणरायाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर दहा दिवस सार्वजनिक गणेश मंडळांनी विविध देखावे सादर केले. सदर देखावे बघण्याकरिता भाविक गर्दी करीत होते. दररोज घरोघरी आरती व प्रसादाचे वाटप करीत होते. जिल्ह्यात ९५६ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची स्थापना केली होती. यापैकी ग्रामीण भागात ३४0 मंडळ आणि शहरी भागात २९५ मंडळांचा समावेश आहे. यावेळी समाजप्रबोधन करणार्‍या गणेश मंडळांना शासन पुरस्कार देणार असल्यामुळे अनेक गणेश मंडळांनी समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले. जिल्ह्यात १५ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन उत्सव साजरा केला जाणार आहे. सदर उत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित रहावी, यासाठी दारूबंदी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी जिल्ह्यात सर्व देशी, विदेशी मद्य विक्री दुकाने, परवानाकक्ष व बीअर बार अनुज्ञप्ती, एफएल/बीआर-२ अनुज्ञप्ती आदी अबकारी अनुज्ञप्त्या बंद राहतील, असे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी कळविले आहे.