शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यातील शिवस्मारकाची आज पायाभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 12:33 IST

Buldhana News छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह आकर्षक अशा शिवस्मारकाची सोमवारी पायाभरणी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहराचे वैभव ठरणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह आकर्षक अशा शिवस्मारकाची सोमवारी पायाभरणी होत आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होत असून, त्यानुषंगाने शिवछत्रपती बहुउद्देशीय स्मारक समितीच्या वतीने या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीस अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. सोमवारी सकाळी दहा वाजता कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी घालून दिलेल्या नियमावलीच्या अधीन राहून हा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती समितीचे कार्याध्यक्ष आ. संजय गायकवाड यांनी दिली. बुलडाणा शहरातील संगम चौकात बसस्थानकालगत असलेल्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह हे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांपेक्षाही अधिक खर्च येणार असून बुलडाणा शहरातील प्रत्येक कुटुंबात त्यांच्या स्वेच्छेने किमान एक रुपया वर्गणीही या स्मारकासाठी घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमास खा. प्रतापराव जाधव, बुलडाणा अर्बनचे डॉ. सुकेश झंवर, जि.प.अध्यक्षा मनीषा पवार, माजी आ.हर्षवर्धन सपकाळ, माजी आ.विजयराज शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, मोहम्मद सज्जाद, जालिंधर बुधवंत, राहुल बोंद्रे, ॲड. नाझेर काझी, लखोजीराजे जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव, योगेंद्र गोडे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.छत्रपती शिवरायांचा हा अश्वारूढ पुतळा पंचधातूचा राहणार असून, भव्य असे स्मारकही येथे उभारण्यात येणार आहे. स्मारकाच्या ठिकाणी आठ अश्वारूढ मावळे, प्रवेशद्वारासमोर दोन हत्ती आणि आणि किल्ला असे आकर्षक स्वरूप या स्मारकाचे राहणार आहे. जिल्हा नियोजन समितीतंर्गतही या स्मारकासाठी निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.  स्थानिक केबल नेटवर्कवर हा कार्यक्रम लाइव्ह दाखविण्यात येणार असून घरीच बसून नागरिकांनी या सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन टी. डी. अंभोरे यांनी केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती