शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात आज दारूमुक्ती निर्धार परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:14 IST

जिल्ह्यात दारूच्या व्यसनाने अनेक परिवार त्रस्त झाले आहेत, तर अनेक परिवार उद्ध्वस्त होत आहेत. या व्यसनाला हद्दपार करण्यासाठी हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यात एक लोकचळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक दिवसांपासून होत आहे. त्यांच्या पुढाकाराने जिल्हास्तरीय संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्यावतीने व हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या प्रमुख आयोजनात ‘दारूमुक्ती निर्धार परिषदेचे’ आयोजन १५ सप्टेंबर रोजी येथील गर्दे हॉलमध्ये दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हा दारूमुक्तीसाठी ‘हिरकणी’चा एल्गारप्रतिष्ठानच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यात लोकचळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात दारूच्या व्यसनाने अनेक परिवार त्रस्त झाले आहेत, तर अनेक परिवार उद्ध्वस्त होत आहेत. या व्यसनाला हद्दपार करण्यासाठी हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यात एक लोकचळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक दिवसांपासून होत आहे. त्यांच्या पुढाकाराने जिल्हास्तरीय संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्यावतीने व हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या प्रमुख आयोजनात ‘दारूमुक्ती निर्धार परिषदेचे’ आयोजन १५ सप्टेंबर रोजी येथील गर्दे हॉलमध्ये दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान करण्यात आले आहे.या परिषदेला दारूबंदी चळवळीच्या प्रणेत्या पारोमिता गोस्वावी यांचे मार्गदर्शन सोबतच सप्तखंजिरीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून समाजप्रबोधनाचे काम करणारे ज्येष्ठ प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे प्रबोधन होणार आहे.  तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट चालीरीती, रुढी, परंपरा व अंधश्रद्धा दूर करण्याचे महान कार्य करणारे अविनाश पाटील हे ‘दारूमुक्तीसाठी आम्ही लढतो आहोत’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. गावस्तरावर सुरू असलेल्या या एकाकी लढय़ाला, जिल्हाभर व्यापक करून संपूर्ण शक्तिनिशी या व्यसनरूपी राक्षसावर प्रहार करणारी एक लोकचळवळ उभी करण्याच्या दृष्टिकोनातून ‘पहिलं पाउल’ म्हणून ‘दारूमुक्ती  निर्धार परिषद’ आयोजन  बुलडाणा येथे गर्दे हॉलमध्ये हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.  या दारूमुक्ती निर्धार परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.