शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
7
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
8
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
9
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
10
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
11
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
12
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
13
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
15
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
16
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
17
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
19
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
20
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

आज एकवटणार सकल मराठा समाज

By admin | Updated: September 26, 2016 02:56 IST

मराठा क्रांती मूक मोर्चासाठी आंदोलकांच्या सुविधांची तयारी पूर्ण.

बुलडाणा, जि. २५- मराठा समाजाला आरक्षण द्यावे, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अँट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवार, २६ सप्टेंबर रोजी बुलडाण्यात मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दिवसभर संपूर्ण जिल्ह्यातच मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्याकरिता जय्यत तयारी करण्यात आली. सोमवारी मोर्चाच्या दिवशी अतिशय शिस्तीत निघणार्‍या या मोर्चाचे नेतृत्व जिजाऊंच्या लेकी करणार आहेत. महिला भगिनीच मोर्चाच्या अग्रस्थानी राहणार आहेत. मोर्चाचे प्रमुख केंद्र जयस्तंभ चौक राहणार असून, या ठिकाणी मोठा स्टेज आहे. स्टेजवर फक्त अकरा मुलीच राहतील आणि त्या मुली शेतमजूर कुटुंबातील असतील. याच मुली जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देणार आहेत. जयस्तंभ चौक, संगम चौक, स्टेट बँक चौक, मलकापूर रोडवरील चावडी चौक, या परिसरात केवळ महिलाच राहणार आहेत. तर जिजामाता व्यापारी संकुलात बुलडाणा शहर आणि परिसरातील शाळा, महाविद्यालयांच्या मुली जमा होणार आहेत. या मोर्चात दहा हजार शिस्त स्वयंसेवकांची प्रत्येक घटनेवर बारीक नजर राहणार आहे. राज्यात इतर ठिकाणी झालेल्या मोर्चाप्रमाणेच हा मोर्चासुद्धा भव्य व संपूर्णपणे शिस्तबद्ध झाला पाहिजे, याची दक्षता समितीसह सर्वांच्यावतीने घेण्यात येत आहे. समितीने दहा हजार स्वयंसेवकांची चमू तयार केली आहे. संपूर्ण मोर्चाचे ड्रोनद्वारे चित्रीकरण केले जाणार आहे. या मोर्चात पोलिसांचीही कडक सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. महिला, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थिनींची मोर्चात बहुसंख्येने उपस्थिती राहणार आहे. मोर्चानंतर शहरात कचरा राहू नये, यासाठीची विशेष काळजीही घेण्यात आली आहे. मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पृष्ठभूमीवर जिल्हय़ातील काही खासगी शाळा, महाविद्यालयांनी सोमवारी सुटी जाहीर केली आहे. विविध समाजाचा पाठिंबा मराठा क्रांती मोर्चाला विविध समाजांनी पाठिंबा जाहीर केला आहे. यामध्ये लोणार येथील मुस्लीम समाज, जैन समाज, नाभिक समाज, अग्रवाल समाज, माहेश्‍वरी समाज, राजस्थानी समाज, दिगंबर जैन संघ, तेरापंथी जैन संघ, धाड येथील बौद्ध समाजाने पाठिंबा दिला आहे. १0 हजार शिस्तसेवक देणार सेवा! मोर्चात १0 हजार शिस्तसेवक वेगवेगळ्या जबाबदार्‍या सेवा म्हणून पार पाडणार आहेत. २५ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता शरद कला महाविद्यालयात नाव नोंदणी झाली. त्यानंतर रात्री ८ वाजेपयर्ंत प्रशिक्षण झाले. त्यानंतर शरद कला महाविद्यालय, राजर्षी शाहू इंजिनिअरिंग कॉलेज, विदर्भ विकास महाविद्यालय, मुकुल वासनिक विधी महाविद्यालय, जिजामाता महाविद्यालय, जनशिक्षण संस्थान, गर्दे वाचनालय, मदर टेरेसा नसिर्ंग कॉलेज आदी ठिकाणी जेवण व मुक्काम. २६ सप्टेंबरला पहाटे पाच वाजता शिस्तसेवकांना डेमो दिला जाईल. सकाळी सात वाजता ओळखपत्र व ड्रेस वाटप आणि ८ वाजेपासून त्यांना विविध ठिकाणी नियुक्त केले जाणार आहे. एसटी बसच्या मार्गात बदल बुलडाणा येथे मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन २६ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. या मोर्चात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणारा जनसमुदाय बघता वाहतूक सोयीच्या दृष्टीने बुलडाणा बस आगाराच्यावतीने बदल करण्यात आले आहेत. चिखली मलकापूर, मलकापूर-चिखली, औरंगाबाद-धाड- बुलडाणा-मलकापूर, मलकापूर-बुलडाणा-धाड- औरंगाबाद मार्गात बदल करण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर, मोताळा, चिखली, धाड, अजिंठा जाणार्‍या व येणार्‍या बसेस, चारचाकी व जडवाहनांना बुलडाणा येथे न येऊ देता पर्यायी मार्गाने वळविणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार मुंबई पोलीस कायदा कलम ३३ (१) अन्वये सह कलम ३६ अन्वये २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ ते रात्री १0 वाजेपर्यंत वरील मार्गांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.