शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांपासून मानधन थकीत

By admin | Updated: October 7, 2014 22:51 IST

निवडणुकीच्या रणधुमाळीत बुलडाणा जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी दुर्लक्षित.

बुलडाणा : एकीकडे विधानसभा निवडणुकीची प्रचंड रणधुमाळी सुरू असताना खेडोपाडी व शहरी विभागात बालकांचे कुपोषण दूर करण्याचे महत्वाचे कार्य करणारे अंगणवाडी कर्मचारी मात्र दुर्लक्षित आहेत. आधीच अतिशय तुटपुंज्या मानधनात काम करणार्‍या अंगणवाडी सेविका व मदतनिसांना गेल्या चार महिन्यांपासून मानधन नसल्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.यासंदर्भात सीटू प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, १ ऑगस्ट २0१४ रोजी सीटू संघटनेचे शिष्टमंडळ तत्कालीन महिला व बाल कल्याण मंत्री वर्षा गायकवाड यांना भेटावयाला गेले असता, अंगणवाडी कर्मचार्‍यांसाठी वाढीव मानधनाची तरतूद वार्षिक अर्थसंकल्पात झालेली नाही, अशी माहिती दिली. त्यानंतर अंगणवाडी कर्मचारी संघटनेने वारंवार राज्य शासनाकडे वाढीव मानधन देण्याची मागणी केली. मात्र गेल्या चार महिन्यांपासून वाढीवच नव्हे जुन्या दराने देखील अंगणवाडी कर्मचार्‍यांचे मानधन देण्यात आलेले नाही. मागील वर्षीपयर्ंत अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनासाठी निधी नसल्यास उणे बजेट पद्धतीने मानधन दिले जात होते. मात्र ही पद्धतही आता बंद करण्यात आल्यामुळे व राज्याकडून निधीच अप्राप्त असल्यामुळे कर्मचार्‍यांचे मानधन करता आले नाही, अशी माहिती जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.एस. कराळे यांनी दिल्याची माहिती, सीटूने काढलेल्या प्रसिध्दी पत्रकात दिलेली आहे.