शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

टिप्परची अँपेला धडक; एक ठार, एक गंभीर

By admin | Updated: May 28, 2014 00:40 IST

मेहकरकडून चिखलीकडे भरधाव वेगाने येत असलेल्या टिप्परने अँपेला धडक दिल्याने एक ठार तर एक गंभीर.

चिखली : मेहकरकडून चिखलीकडे भरधाव वेगाने येत असलेल्या रेतीची वाहतूक करणार्‍या टिप्परने केळवदवरुन सवडद येथे जात असलेल्या अँपेला जबरदस्त धडक दिल्याने एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना कोलारा फाट्यानजीक २६ मेच्या रात्री १0.३0 वाजेच्या दरम्यान घडली. साखरखेर्डा पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या सवडद येथे केळवदवरुन पैशाचा व्यवहार करण्यासाठी जात असताना कोलारा फाट्यानजीक समोरुन भरधाव वेगाने वाळू वाहतूक करणारे टिप्पर क्रमांक एम.एच.३४ ला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात अशोक धोंडू खराट (४0) रा.केळवद व गजानन विलास देशमुख (५0) सवडद हे दोघे गंभीर जखमी झाले असून, अँपेचा चालक प्रताप सुरेश पाटील हा किरकोळ जखमी झाला आहे. अपघाताची माहिती कळताच चिखली पोलिस स्टेशनचे कर्मचारी व मनसेचे शेतकरी सेलचे प्रदीप भवर, प्रवीण महाडीक, रवि पेटकर, काँग्रेसचे विष्णू सोळंकी यांनी अपघात स्थळावर धाव घेऊन जखमीला ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात हलविले. ग्रामीण रुग्णालमध्ये जखमींवर प्रथमोपचार करुन पुढील उपचारार्थ त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान अशोक धोंडू खराटे (४0) रा.केळवद या इसमाचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रताप सुरेश थोरात रा.केळवद वय २९ यांनी चिखली पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी ट्रकचालकावर कलम २७९, ३३७, ३३८, ३0४ अ नुसार गुन्हा दाखल केला असून, तर औरंगाबाद येथे भरती असलेले गजानन विलास देशमुख यांची प्रकृती चिंताजनक आहे.