शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
3
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
4
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
5
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
6
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
7
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
8
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
9
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
10
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
11
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
12
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
13
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
14
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
15
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
16
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
17
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
18
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
19
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
20
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव

वेळेवर उपचार केल्यास म्युकरमायकोसिस पूर्ण बरा होतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:33 IST

बुलडाणा : कोविडबाधित रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी हा आजार दिसून येत आहे. म्युकरमायकोसिस हा एक सामान्यत: दुर्मिळ असा ...

बुलडाणा : कोविडबाधित रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी हा आजार दिसून येत आहे. म्युकरमायकोसिस हा एक सामान्यत: दुर्मिळ असा बुरशीजन्य आजार आहे. या आजारावर वळेत निदान व उपचार केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे घाबरून न जाता नागरिकांनी जागरूक राहून उपचार घ्यावेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी दिली.

म्युकरमायकोसिस हा आजार म्युकर नावाच्या बुरशीमुळे होतो. ही बुरशी जमिनीत, खतामध्ये, सडणाऱ्या फळांत व भाज्यांत, तसेच हवेत आणि अगदी निरोगी व्यक्तीच्या नाकांत व नाकाच्या स्रावातदेखील आढळते. ज्या व्यक्तीमध्ये रोग प्रतिकारक शक्ती कमी होते, अशा रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची बाधा होण्याचे प्रमाण अधिक असू शकते.

राेगप्रतिकार शक्ती कमी असणाऱ्यांना धाेका

ज्यांना स्टेरॉईड औषधे दिली जात आहेत आणि त्यामुळे त्यांची रोग प्रतिकारकशक्ती कमी झाली आहे, ज्यांचा मधुमेह अनियंत्रित आहे, ज्यांना कर्करोग आहे किंवा ज्यांचे नुकतेच अवयव प्रत्यारोपण झाले आहे, ज्यांना इम्युनमोड्युलेटर्स अर्थात रोग प्रतिकारक शक्तीत फेरफार करणारी औषधे दिली जात आहेत, जे प्रदीर्घ काळ आयसीयू म्हणजे अतिदक्षता कक्षात दाखल आहेत, ज्यांना प्रदीर्घ काळापासून ऑक्सिजन थेरपी दिली जात आहे, ज्यांना जुनाट किडनी किंवा लिव्हरचा आजार आहे, अशांना हा आजार हाेण्याचा धाेका असताे़

म्युकरमायकोसिस टाळण्यासाठी हे करा

रक्तातील साखरेची, एचबीएसीची तपासणी करा, रक्तातील साखरेवर काटेकोर नियंत्रण ठेवा, कोविडनंतर रक्तातील साखरेची पातळी आणि मधुमेह यांचे निरीक्षण करा, स्टेरॉईडचा वापर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करा, घरी ऑक्सिजन घेतला जात असल्यास स्वच्छ ह्युमिडीफायरमध्ये निर्जंतुक पाण्याचाच वापर करा, अँटिबायोटिक / अँटिफंगल औषधांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा.

हे करू नका

आजाराची चिन्हे व लक्षणे याकडे दुर्लक्ष करू नका, बंद असणारे नाक हे बॅक्टेरियल सायनुसायटिसमुळे असावे असा विचार करू नका (विशेषत: इम्युनोसप्रेशन झालेले आणि कोविडमुळे ज्यांना इम्युनोमॉड्युलेटर्सचे उपचार दिले गेले आहेत) या आजाराची तपासणी करून घेण्यास आग्रही राहून दुर्लक्ष करू नका.

या लक्षणांवर लक्ष ठेवा

डोळे दुखणे, डोळ्यांच्या बाजूला लाली येणे, नाक चोंदणे, सूज येणे, ताप येणे, डोके दुखणे, खोकला, दात, हिरड्या दुखणे व दात ढिले होणे, श्वास घेण्यास त्रास, रक्ताची उलटी होणे व मानसिक स्थितीवर परिणाम.