शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहार कामगारांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:05 IST

मेहकर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशात ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, विद्यार्थ्यांच्या मनात शाळेविषयी आवड ...

मेहकर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशात ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, विद्यार्थ्यांच्या मनात शाळेविषयी आवड निर्माण व्हावी आणि कुपोषण निर्मूलन अशा अनेक चांगल्या उद्देशाने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजना सन २००३ पासून अंमलात आणली असून, आजतागायत सुरळीत चालू आहे.

परंतु मागील वर्षी आलेल्या कोरोना महामारीपासून या योजनेअंतर्गत आलेल्या धान्याचे घरपोच वाटपाचे काम हे शालेय पोषण आहार कामगार नियमितपणे करीत आहेत.

त्याचा मोबदलापण त्यांना माहे ऑक्टोबर २०२०पर्यंत मिळाला आहे. परंतु नोव्हेंबर २०२० पासून आजपर्यंत त्यांना मानधन मिळाले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

कामगार हे दररोज नियमितपणे शाळेत हजर राहून शाळा परिसर स्वच्छ करतात. शिवाय शिक्षकांनी सांगितलेले इतर कामेसुद्धा करतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार लाॅकडाऊन काळात कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कामगारांचं मानधन रोखण्यात येऊ नये, असे आदेश असतानाही काही अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून शालेय पोषण आहार कामगारांवर अन्याय करत आहेत.

दुसरीकडे महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यात शालेय पोषण आहार कामगारांना त्यांचं मानधन त्यांच्या खात्यावर जमा झाले आहे आणि बुलढाणा जिल्ह्याचे अधिकारी हे उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ काढू धोरण अवलंबत आहेत.

अवघ्या १५०० रु. एवढ्या तुटपुंज्या मानधनावर हे कामगार गावच्या सगळ्या मुलांची डोळ्यात तेल घालून जबाबदारी सांभाळत असताना त्यांचे मानधन थांबवण्यात आले आहे. त्यामुळे येत्या १० मार्चपर्यंत जिल्हा प्रशासनाने शालेय पोषण आहार कामगारांच्या खात्यात त्यांचं मानधन जमा केले नाही तर जिल्हा सिटूच्या वतीने कोरोनाकाळातसुद्धा जिल्हा परिषदेत शालेय पोषण आहार कामगारांचा प्रचंड मोर्चा काढण्यात येईल ,असा इशारा जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड, उपाध्यक्षा शोभा काळे, जिल्हा सचिव समाधान राठोड, जिल्हा कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर वाघमारे आदींनी दिला आहे.