शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय्य तृतीयेमुळे सोन्याला झळाळी!

By admin | Updated: April 27, 2017 00:10 IST

खामगावात सराफा बाजार तेजीत : सराफा व्यावसायिकांना ‘अच्छे दिन’

खामगाव : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेनिमित्त खामगाव येथील सराफा बाजार तेजीत आला असून, सोन्याच्या खरेदीला झळाळी मिळाली आहे, त्यामुळे सराफा व्यावसायिकांना नोटबंदीनंतर प्रथमच अच्छे दिन आले असल्याचे दिसून येते.चांदीसाठी प्रसिद्ध असलेल्या खामगावला येथील चांदी उद्योगामुळे ‘रजतनगरी’अशी ओळख प्राप्त झालेली आहे. येथील चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी दूरदुरुन ग्राहक येत असतात. त्यामुळे जिल्ह्यात सराफा व्यवसायासाठी खामगावला महत्त्व दिले जाते. खामगावात सोन्या-चांदीचे दागिने व अन्य वस्तू खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे; परंतु नोटबंदीनंतर चलन तुटवडा जाणवू लागल्यापासून सराफा बाजारावर मंदीचे सावट पसरले होते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी खरेदी केली; पण ही खरेदी सरासरीपेक्षा अधिक नव्हती. त्यामुळे सराफा व्यवसायात खऱ्या अर्थाने तेजी आलीच नाही; मात्र अक्षय्य तृतीयेला खरेदी करण्याकडे अनेकांचा कल दिसून येत असून, बऱ्याच जणांनी अ‍ॅडव्हान्स बुकींगही केलेली आहे. हवे असलेले दागिने अक्षय्य तृतियेच्या दिवशीच मिळावेत, अशी त्यांची मागणी असल्याचे एका दुकानदाराने सांगितले. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे किंवा सोन्याचे दागिने भेट म्हणून दिल्यास ते अक्षय्य म्हणजेच कधीही संपत नाहीत, अशी कल्पना आहे. शिवाय या दिवशी कोणताही मुहूर्त पहावा लागत नाही. त्यामुळे किरकोळ खरेदी करणारे ग्राहक थेट सराफा दुकानात येऊन दागिने खरेदी करतात; मात्र लग्नसराईचे दिवस असल्याने बहुतेक ग्राहक मोठ्या आकाराचे दागिने अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मिळावेत म्हणून आधीच बुकींग करून ठेवतात. त्यामुळे सराफा बाजारात लगबग सुरु झाल्याचे दिसून येते. दरम्यान, नोटाबंदीनंतर थंडावलेल्या सराफा बाजाराने गुढीपाडव्याला काही अंशी उचल खाल्ल्याचे चित्र होते; मात्र पाडव्याला सरासरी बाजार झाल्यानंतरही अक्षय्य तृतीयेला चांगला व्यवसाय होण्याची सराफा व्यावसायिकांना अपेक्षा आहे. डिजिटल पेमेंटकडे वाढला कलनोटाबंदीनंतर चलन तुटवडा निर्माण झाल्याने ग्राहकांचा डिजिटल पेमेंटकडे कल वाढला आहे. अनेक ग्राहक स्वाईप कार्डद्वारे तसेच चेकद्वारे पेमेंट करीत असल्याची माहिती येथील नवलचंद मिठूलाल ज्वेलर्सचे संचालक शहा यांनी दिली.