शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदी करण्यासाठी ठिय्या!

By admin | Updated: June 15, 2017 00:19 IST

शिव सैनिकांनी कर्मचाऱ्यांना धरले धारेवर

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : तूर विक्रीकरिता नोंदणी करुन टोकन प्राप्त केलेल्या त्या १६२४ तूर उत्पादक शेतकऱ्यांची तूर खरेदी पूर्ववत सुरु न करण्यात आल्याने या संदर्भात जाब विचारण्याकरिता शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह १४ जून रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयावर धडक देत मुख्य प्रशासकांच्या कॅबीनमध्ये ठिय्या करीत जाब विचारुन उपस्थित कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर विक्री करिता सद्यस्थितीत २२६० शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यांना बाजार समितीने टोकन सुध्दा दिले. त्यापैकी जवळपास ६३६ शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप बाजार समितीकडून केल्या गेले. मात्र उर्वरित १६२४ शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याबाबत साशंकता कायम असल्याने याबाबत शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे यांनी १० जून रोजी बाजार समिती प्रशासनाला रितसर निवेदन देत तूरखरेदी प्रक्रिया सुरु करण्याची मागणी केली होती. मात्र अद्यापपावेतो या मागणीवर निर्णय न झाल्याने १४ जून रोजी दुपारी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बाजार समिती कार्यालयावर धडक दिली.यावेळी बाजार समितीचे मुख्य प्रशासक साहेबराव पाटील व सचिव राधेश्याम शर्मा हे कार्यालयात हजर नव्हते. त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बाजार समितीचे प्रशासक यांचे कॅबीनमध्ये ठिय्या दिला. तसेच उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना तूर खरेदी संदर्भात जाब विचारला. यावेळी तालुका उपप्रमुख अनंता गायगोळ, गजानन धाडे, सुरेश अहीर, श्रावण पाटील, समाधान साठे, संदेश शिंदे, स्वप्नील तडेकर, सचिन चव्हाण, अक्षय जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते. कृषी अधिकाऱ्यांना घातला घेरावतालुक्यातील जलयुक्त शिवारांच्या निकृष्ट कामांची तत्काळ चौकशी करावी, या मागणीसाठी शिवसेना शहरप्रमुख किशोर नवले यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी कृषी अधिकारी बुधवत यांना घेराव घालून धारेवर धरले. मलकापूर तालुक्यात जलयुक्त शिवारांची कामे अतिशय संथगतीने सुरु असून, त्यातही होणारे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी शिवसेना शहर प्रमुख किशोर वले व उप तालुकाप्रमुख राजेशसिंह राजपूत यांच्याकडे बोलून दाखविली. निकृष्ट कामांमुळे त्याठिकाणी पाणीच साचत नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा कुठलाही फायदा होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले होते. दरम्यान या बाबीची तत्काळ दखल घेत १४ जून रोजी शिवसेना शहरप्रमुख किशोर नवले, तालुका उपप्रमुख राजेशसिंह राजपूत व शिवसैनिकांनी कृषी कार्यालय गाठत उपस्थित कृषी अधिकारी बुधवत यांना या विषयावर धारेवर धरत जाब विचारला. दरम्यान, कृषी अधिकारी बुधवत यांनी आम्ही सुरु असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करु, ती कामे चांगल्या प्रकारे करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगत निकृष्ट झालेल्या कामाची तत्काळ चौकशी करणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख किशोर नवले, उप तालुकाप्रमुख राजेशसिंह राजपूत, माजी तालुकाप्रमुख एकनाथ डवले, कृउबास प्रशासक उमेश राऊत, शहर उपप्रमुख उमेश हिरुळकर, युवा सेना जिल्हा उपप्रमुख अमोल टप, नगरसेवक राजेश फुलोरकार, युवा सेना शहर उपप्रमुख योगेश ढगे, संदीप पाटील, मयूर मंडवाले, सचिन रुले, संदीप भंसाली, महादेव पवार आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.