शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

खवा विक्रेत्यांवर धाडी; चार नमुने प्रयोगशाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:28 IST

नांदुरा : अन्न व औषध प्रशासन बुलडाणा कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी शुक्रवारी नांदुरा शहरातील खवा विक्रेत्यांच्या दुकानांवर धाड टाकत चार जणांचे नमुने तपासणीसाठी घेतले.  त्यामुळे खवा विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. 

ठळक मुद्देअन्न व औषध विभागाची नांदुर्‍यात कारवाई निकृष्ठ मिठाई विक्रेते रडारवर!

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : अन्न व औषध प्रशासन बुलडाणा कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी शुक्रवारी नांदुरा शहरातील खवा विक्रेत्यांच्या दुकानांवर धाड टाकत चार जणांचे नमुने तपासणीसाठी घेतले.  त्यामुळे खवा विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली.   अन्न सुरक्षा अधिकारी सं.ल.सिरोसिया व गोपाल माहोरे यांच्या पथकाने १३ ऑक्टोबर रोजी पहाटे रेल्वे स्टेशन जवळ भेट देऊन खवा विक्रेत्यांची तपासणी केली. खव्यांचे 0४ नमुने विविध विक्रेत्यांकडून घेऊन विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविले. दिवाळीच्या अनुषंगाने खव्याची मागणी जास्त असल्याने उलाढाल वाढते. त्यामुळे भेसळीची शक्यता नाकारता येत नाही. नांदुरा ही पूर्वीपासूनच खव्याची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. गावातील किरकोळ उत्पादक घरात खवा तयार करून जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेरसुद्धा पुरवठा करतात.शुक्रवारी नांदुरा स्टेशन परिसरात खवा उत्पादक  विक्रेते सकाळी सदर खवा विक्री पुरवठा करण्यासाठी जमलेले असताना अन्न सुरक्षा अधिकार्‍यांनी छापा मारला. यावेळी विविध खवा विक्रेत्यांकडील खव्याची आयोडिनची चाचणी केलेली असून, 0४ नमुने विश्लेषणासाठी घेतलेले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी ओळखीच्या तसेच नियमित व्यवसाय करणार्‍या व्यक्तीकडूनच खवा खरेदी करावा. तसेच खव्याचा वास येत असल्यास किंवा काही शंका आल्यास सदर विक्रेत्याकडून खवा कमी भावात खरेदी करु नये, तसेच याबाबत काही तक्रार असल्यास कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनसुद्धा करण्यात आले. यासोबतच उपस्थित खवा विक्रेते व उत्पादकांना आवश्यक प्रबोधन करून कार्यशाळासुद्धा घेण्यात आली आहे. 

खवा विक्रेत्यांची धावपळअन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी नांदुरा रेल्वे स्टेशन परिसरात छापा टाकला. या छाप्याची माहिती मिळाली असता खवा विक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली. खवा विक्रेत्यांसोबतच निकृष्ट दर्जाच्या मिठाईची विक्री करणारे विक्रेते अन्न व औषध प्रशासनाच्या रडारवर असल्याचे समजते. सणासुदीच्या दिवसात मिठाईची मागणी लक्षात घेता भेसळ करणार्‍यांच्या संख्येतही वाढ होते. या पार्श्‍वभुमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून वेळीच उपाययोजना करून खबरदारी घेतल्या जात आहे.

दिवाळीचे फराळ बनविणार्‍यांची होणार तपासणी सध्या सर्वत्र दिवाळीच्या फराळाची दुकाने लागली आहेत. दिवाळीचा फराळ बनविताना अनेकदा अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने बनविण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यात येते. त्यामुळे यानंतर दिवाळीचे फराळाचे नमुने तपासण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. 

टॅग्स :foodअन्न