शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळातही उंबरठा उत्पन्न जास्त!

By admin | Updated: July 21, 2016 23:53 IST

शासनाचा अहवालानुसार दुष्काळातही उंबरठा उत्पन्न जास्त दाखवल्याने ८६ हजार ३३८ शेतकरी दुष्काळी निधीपासून वंचित.

विवेक चांदूरकर / बुलडाणाजिल्ह्यात सातत्याने तीन वर्षांपासून अल्प पावसामुळे दुष्काळ असल्यावरही शासनाच्यावतीने जिल्ह्यातील पिकांचे उंबरठा उत्पन्न जास्त दाखविण्यात आल्याने जिल्ह्यातील कापूस व तूर उत्पादक ८६ हजार ३३८ शेतकरी दुष्काळी निधीपासून वंचित राहिले आहेत. दुसरीकडे शेतकर्‍यांनी ५0 टक्क्यांपेक्षा कमी उत्पन्न झाल्यावरही उंबरठा उत्पादन जास्त कसे निघाले? असा आरोप केला आहे. जिल्ह्यात सन २0१२ पासून अवर्षण होत आहे. तीन वर्षे जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने किंवा पावसाने एक ते दीड महिन्याची दडी दिल्याने पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली, तर काही शेतकर्‍यांना दरवर्षीपेक्षा ५0 टक्के कमी उत्पन्न झाले. मात्र, अशी परिस्थिती असतानाही जिल्ह्यात तूर पिकासाठी ५९, तर कापसासाठी ४७ महसूल मंडळांमध्ये उंबरठा उत्पन्न जास्त झाल्याचे शासनाने दाखविले. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना हेक्टरी ६८00 रुपये दुष्काळी मदत मिळाली. यासोबतच शेतकर्‍यांना पीक विमाही मिळाला. मात्र, शासनाने उंबरठा उत्पन्न जास्त दाखविल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी या दोन्ही दुष्काळी मदत व पीक विम्यापासून वंचित राहिले. असे निघते उंबरठा उत्पन्न यावषीर्चे सरासरी उत्पन्न हे उंबरठा उत्पन्नापेक्षा जास्त आल्यास विमा नुकसानभरपाई मिळत नाही. उंबरठा उत्पन्न हे मागील पाच वर्षाच्या सरासरी गुणीले जोखीमस्तर यानुसार निश्‍चित करतात. पीक विमा नुकसानभरपाईचा लाभ न मिळालेल्या शेतकरी खातेदारांपैकी तूर ५५ हजार ९८८ व कापूस २0 हजार ३४४ या दोन पिकांचे जास्तीत जास्त खातेदार आहेत.२२९ महसूल मंडळे पीक विम्यापासून वंचित जिल्ह्यात एकूण कापूस पिकासाठी ४७, तूर पिकासाठी ५९, भुईमूग पिकासाठी १७, तिळासाठी ४0, मूग पिकासाठी २२, उडीद पिकाकरिता ५, सोयाबीनसाठी एक आणि ज्वारी पिकासाठी ३९ महसूल मंडळांमध्ये पीक विमा मंजूर नाही. पीक विमा मंजूर नसलेल्या महसूल मंडळातील शेतकर्‍यांना कुठल्याही प्रकारे पीक विमा नुकसानभरपाईपासून वगळले किंवा वंचित ठेवण्यात आलेले नाही. या महसूल मंडळामध्ये वार्षिक सरासरी उत्पन्न हे उंबरठा उत्पन्नापेक्षा जास्त आल्यामुळे पीक विमा लागू झालेला नाही.