लोणार (जि. बुलडाणा): तालुक्यातील वेणी येथे शॉट सर्किटमुळे आग लागून तीन एकर शेतातील गहू जळून खाक झाल्याची घटना ७ मार्च रोजी सकाळी ९.३0 वाजता घडली. वेणी येथील बाबूराव गोपाळ सरदार यांच्या गहू पेरलेल्या शेतातून वीज खांब गेलेले असून, गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वार्यामुळे खांबावरील विद्युत तारा शेतजमिनीवर लोंबकळल्या होत्या. याची माहिती सरदार यांनी वेणी येथील वायरमन दराडे यांना दिलेली होती. वारंवार पाठपुरावा केल्याने दराडे यांनी थातूरमातुर दुरुस्ती करुन विद्युत तारा लोंबकळतच ठेवल्या. विद्युत तारा दुरुस्त करण्यासंदर्भात सुखदेव बाबूराव सरदार यांनी अनेक वेळा मागणीही केली; मात्र लोंबकळलेल्या विद्युत तारांकडे दुर्लक्षच राहिल्याने या विद्युत तारांच्या ठिकाणी शॉटसर्किट होऊन बाबूराव सरदार यांच्या तीन एकर शेतातील गहू पिकाला आग लागली. घटना घडल्यानंतर शेतकर्यांनी तलाठी डोईफोडे यांना दूरध्वनीवरुन माहिती सांगितली असता, आगीचे फोटो व्हॉट्स अँपवर टाका, असे सांगून घटनास्थळावर पंचनामा करण्याचे टाळल्याची माहिती शेतकरी सरदार यांनी 'लोकमत' शी बोलतंना दिली. .
तीन एकरातील गहू खाक
By admin | Updated: March 8, 2016 02:33 IST