शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार मतदार राहणार मतदानापासून वंचित!

By admin | Updated: August 18, 2016 00:58 IST

मेहकर पालिकेत हरकतीचा मुद्दा गाजणार; माजी नगराध्यक्ष जाणार न्यायालयात.

रफिक कुरेशी मेहकर (जि. बुलडाणा), दि. १७: येथील प्रभाग क्र. २ मधील काही भाग शहराच्या हद्दीबाहेर असल्याचे निवडणूक विभागाने निश्‍चित केल्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत या भागातील सुमारे तीन हजार नागरिकांना आपल्या पवित्र मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागणार आहे. त्यामुळे येथील नागरिकाबरोबरच या प्रभागातील विद्यमान नगरसेवक व इच्छुक उमेदवारामध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. सन २0११ च्या जनगणनेनुसार प्रभाग क्र. २ ची लोकसंख्या जवळपास सात हजार एवढी असून, मतदार संख्या ४ हजार १९६ एवढी आहे. मागील ३0 वर्षांपासून या भागातील नागरिक नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावतात. हा संपूर्ण प्रभाग अधिकृत पालिकेच्या हद्दीत असल्यामुळे या प्रभागातील नागरिकांना मागील ३0 वर्षांपासून नगरपालिका मूलभूत सुविधा पुरवित आहे. सध्या या प्रभागाचे विद्यमान नगराध्यक्ष हसीनाबी कासम गवळी, कल्पना निकस, अशोक अडेलकर आणि संजय जाधव हे नगरसेवक नेतृत्व करीत आहेत. मागील पाच वर्षांत विद्यमान नगराध्यक्ष हसीनाबी कासम गवळी यांनी या प्रभागामध्ये रस्ते, नाल्या, विद्युत सुविधा, नळयोजना यासह अन्य विकासाची कामे केली. जवळपास ५ कोटी रुपयांची कामे झाल्याचा दावा नगराध्यक्षांनी केला आहे. नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर नगरपालिकेने नियमानुसार शासनाच्या निकषानुसार शहरातील १२ प्रभागाचे प्रस्ताव निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर केले. त्यानंतर प्रशासनाने नवीन प्रभाग रचनेवर हरकती मागितल्या. यामध्ये प्रभाग २ मधील प्रभाग रचनेवर काहींनी हरकती घेतल्या. यामध्ये प्रभाग दोनचा काही भाग हा हद्दीबाहेरचा असल्याचे म्हटले होते. त्यानुसार प्रशासनाने या प्रभागातील जवळपास तीन हजार मतदार हे हद्दीबाहेरचे ठरवून त्यांच्या मतदानाचा अधिकार काढून घेतला. त्यामुळे मागील ३0 वर्षांपासून पालिकेच्या निवडणुकीत मतदान करणार्‍या या मतदारांना येणार्‍या निवडणुकीत मतदानाच्या पवित्र हक्कापासून वंचित रहावे लागणार आहे.