शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर बाजार समितीत सोयाबीनची तीन हजार क्विंटलची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 19:39 IST

मेहकर : सोयाबीन पिक निघायला सुरुवात झाली असून, ४ आॅक्टोबर रोजी मेहकर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास तीन हजार क्विंटल सोयाबीनची आवक आली आहे. मात्र सोयाबीनला पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

ठळक मुद्देसोयाबीन पिक निघायला सुरुवात सोयाबीनला पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी हैराण 

उध्दव फंगाळ  लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : सोयाबीन पिक निघायला सुरुवात झाली असून, ४ आॅक्टोबर रोजी मेहकर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास तीन हजार क्विंटल सोयाबीनची आवक आली आहे. मात्र सोयाबीनला पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.मेहकर तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी अधिक होते. पावसाळ्याच्या सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात पाऊस चांगला पडला असला तरीपण त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याने याचा परिणाम सोयाबीन, उडीद, मूग व इतर पिकांवर झाला आहे. अनेक शेतकºयांना एका एकरामध्ये केवळ ३ ते ४ क्विंटलची झडती लागली आहे. शेतकºयांना विविध बँकांकडून पेरणीच्या वेळेवर पिककर्ज मिळाले नसल्याने बहुतांश शेतकºयांनी उसनवार करुन तर उधारीवर बि-बियाणे, खते खरेदी करुन पेरणी केली आहे. मात्र पावसाने सुद्धा वेळेवर साथ दिल्याने पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. पाहिजे त्या प्रमाणात पिकांचे उत्पादन झाले नाही तर बाजारात सोयाबीनला २ हजार ५०० रुपये ते २ हजार ८०० रुपयेच भाव आहे. उडीद, मूग, तूर, चना, गहू या पिकांना सुद्धा भाव नाहीत. शेतात पेरणीसाठी लागलेला खर्च सुद्धा निघतो का नाही, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. तर पेरणीसाठी लोकांकडून आणलेले पैसे, इतर उसनवार कशी फेडावी, या विवंचनेत शेतकरी दिसत आहेत. नुकताच दसरा सण झाला असून दिवाळी अवघ्या काही दिवसावर आली आहे. पिकांच्या उत्पादनात झालेली घट, बाजारात पिकांना भाव नसणे, यामुळे दिवाळी साजरी कशी करायची या चिंतेत शेतकरी आहेत. त्यामुळे शासनाने आता शेतकºयांच्या पिकांना चांगला भाव देऊन शेतकºयांची दिवाळी चांगली झाली पाहिजे, हीच अपेक्षा शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. 

सोयाबीनचे दिड कोटी अनुदान अद्याप आलेच नाही४मागीलवर्षी सोयाबीनची आवक चांगल्या प्रमाणात झाली होती. परंतु बाजारात सोयाबीनला भाव नव्हते. त्यामुळे शासनाने शेतकºयांना मदत करण्याच्या उद्देशाने सोयाबीनला प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान जाहीर केले होते. त्यामुळे हजारो शेतकºयांनी या अनुदानासाठी नोंदणी करुन दिलेली आहे. मात्र गेल्या ७ ते ८ महिन्यापासून या अनुदानाचे मेहकर तालुक्यातील जवळपास दिड कोटी रुपये शासनाकडे थकीत असून शासनाच्या निष्काळजीमुळे शेतकरी मात्र परेशान झाले आहेत.