शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वर्षभरात तीन हजार अवयव प्रत्यारोपण

By admin | Updated: May 11, 2017 07:03 IST

४२३ प्रत्यारोपण केंद्रांचा समावेश; अवयव दानातून जपली माणुसकी

नीलेश शहाकार बुलडाणा : सामाजिक भान व माणुसकीचा धर्म जोपासत अवयव दानाची नवीन संकल्पना समाजात रुढ होत आहे. मृत्यूनंतर डोळे, मुत्रपिंड, यकृतापासून थेट हृदयापर्यंत दान करून ह्यमरावे परि अवयव रूपाने उरावेह्ण या संकल्पनेतून इतरांना नवजीवन मिळत आहे. आरोग्य सेवा संचालनालयाने शासनाकडे सादर केलेल्या अहवालानुसार २०१६-१७ या वर्षात ३ हजार १५३ अवयव प्रत्यारोपणाची नोंद करण्यात आली आहे.मानवाचे सत्कर्म त्याचे अस्तित्व मृत्यूनंतरही भूतलावर प्रदीर्घ काळ कायम ठेवते; परंतु प्राण गेल्यानंतरही अवयवांच्या रूपाने आणखी काही काळ मनुष्य ईहलोकी राहू शकतात, हे वैज्ञानिक सत्य आहे. अर्थात त्यासाठी अवयव दान हा पर्याय प्रत्येकाकडे उपलब्ध आहे. अवयवच नव्हे, तर संपूर्ण शरीरच दान करणाऱ्यांच्या सामाजिकतेला ईश्वरी कार्य म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मानवी उपचारांकरिता तसेच मानवी अवयवांची व्यावसायिक विक्री रोखण्याकरिता तत्संबंधी मानवी अवयव काढणे, जतन करणे, प्रत्यारोपण करणे यांचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी केंद्र शासनाने मानवी अवयव प्रत्यारोपण अधिनियम १९९४ लागू केला आहे. त्यामुळे अनुकूल कायदे, योग्य सरकारी धोरण, तत्पर आणि सुसज्ज रुग्णालये आणि माणुसकीची जाण ठेवणारे नागरिक यामुळे अवयव व देहदान करणारे पुढे येत आहेत.