शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पशुपालनाच्या तीन नव्या योजनांना हवी मुदतवाढ

By admin | Updated: August 10, 2015 23:08 IST

या योजनेपासून शेतकरी अनभिज्ञ असल्यामुळे जनजागृतीची गरज व्यक्त होत आहे.

हर्षनंदन वाघ/ बुलडाणा : आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांसाठी पशुपालनाच्या तीन नव्या योजना शासनाने सुरू केल्या आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट असून, या योजनेबाबत जनजागृती न झाल्यामुळे याबाबत अनेक शेतकरी अनभिज्ञ आहेत. शेतकर्‍यांच्या हितासाठी या योजनेबाबत जनजागृती करून, योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी जोर धरत आहे. राज्यात नैसर्गिक आपत्ती व दुष्काळामुळे चाराटंचाई निर्माण झाल्याने शेतकरी पशुपालन व्यवसायाकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे पशुपालनास प्रोत्साहन मिळावे, पशुव्यवसायाकडे शेतकरी वळावा, यासाठी शासनाने तीन नव्या योजना १ जुलैपासून सुरू केल्या होत्या. राज्यशासनाकडून सहा दुधाळ गाई, म्हशी गट वाटप, ५0 टक्के अनुदानातून शेळी गटाचे वाटप तसेच ५0 टक्के अनुदानातून मांसल कुक्कुट पक्षी पालन योजनोचा यामध्ये समावेश आहे. यासाठी दारिद्रय रेषेखालील, बचतगट, बेरोजगार यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी १ जुलै २0१५ पासून सुरू करण्यात आली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत १७ ऑगस्ट २0१५ आहे. योजना सुरू झाल्यानंतर जवळपास दीड महिन्याच्या कालावधीत या योजनेबाबत पुरेसी जनजागृती न केल्यामुळे अनेक शेतकरी योजनांपासून वंचित आहेत. या योजनांची माहिती अनेक शेतकर्‍यांपर्यंंत पोहचलीच नसल्याने, मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.*शेतकर्‍यांना मार्गदर्शनाची गरजमान्सूनचा पाऊस झाल्यानंतर पावसाने जवळपास दीड महिना दडी मारली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना शासनाच्या या योजनांबाबत मार्गदर्शन करण्याची गरज आहे. शेतकर्‍यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांचा पशुपालन व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. त्यामुळे पशुपालन व्यवसाय वाढण्यास मदत होईल.