शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव बाजार समितीमधील आणखी तीन संचालक अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 11:11 IST

Shegaon Market Committee : सभापती गोविंदराव मिरगे यांच्या पाठोपाठ भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे निवडून आलेले सर्व संचालक अपात्र घोषित झाले आहेत.

- अनिल उंबरकारलोकमत न्युज नेटवर्कशेगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील उपसभापतीसह आणखी तीन संचालक अपात्र झाले आहेत. त्यामुळे सभापती गोविंदराव मिरगे यांच्या पाठोपाठ भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे निवडून आलेले सर्व संचालक अपात्र घोषित झाले आहेत. सध्यस्थितीत कृउबास मध्ये जेष्ठ नेते पांडुरंगदादा पाटील यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलचे सभापती श्रीधर उन्हाळे यांच्यासह १० संचालक कार्यरत आहेत.कृउबास उपसभापती सुनिल वानखडे, संचालक देवानंद घुईकर, पुष्पा राजेश शेजोळे हे ग्रामपंचायत सदस्य होते. ग्रामपंचायत मतदार संघातून कृउबासमध्ये  ते निवडून आले होते. मात्र ऑगस्ट २०२० मध्ये सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्याने तिघांनी ग्रामपंचायतीची पुन्हा निवडणूक लढविली. त्यामध्ये पराभूत झाले. यासंदर्भात वेगवेगळ्या व्यक्तीनी आक्षेप घेतले. त्यामुळे मुळ ग्रामपंचायत सदस्यत्वच नसल्याने त्यांचे कृउबास संचालक पद रद्द झाले. जिल्हा उपनिबंधक आर.एल.राठोड यांनी त्यांच्या अपात्रतेचा आदेश दिला.चार वर्षापूर्वी भाजप परिवर्तन पॅनलचे माजी कृउबास सभापती गोविंदराव मिरगे, अनुपमा मिरगे, देवेंद्र हेलगे आत्माराम महाले, रूपाली बोरडे, विठ्ठल भांबेरे, शेख नजीर, देवानंद घुईकर, पुष्पा राजेश शेजोळे तर पूर्वी परिवर्तन पॅनलमधे नंतर सहकार पॅनेलमध्ये प्रवेश घेऊन उपसभापती झालेले सुनील वानखडे असे एकूण १० सदस्य आतापर्यंत अपात्र झाले आहेत. 

टॅग्स :ShegaonशेगावAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती