शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे आणखी तीन बळी, २१५ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 11:18 IST

Buldhana News शनिवारी पुन्हा तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 बुलडाणा : गेल्या चार दिवसांत सहाजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर शनिवारी पुन्हा तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना मृत्यूचा दर सध्या १.१७ वर स्थिर असला, तरी गेल्या पाच दिवसांत नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वास्तव आहे. परिणामी संभाव्य दुसऱ्या लाटेचा विचार करता, संसर्ग टाळण्यासाठी अधिक सतर्कता गरजेची झाली आहे. दुसरीकडे कोरानाचा २० फेब्रुवारीचा पॉझिटिव्हिटी रेट २१ टक्क्यावर असून, एकूण २१५ जण बाधित आढळून आले आहेत.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेंट टेस्ट कीटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण १०३० जणांचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. त्यापैकी २१५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर ८१५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह  आलेल्यांमध्ये बुलडाणा २९, पोखरी एक, केसापूर चार, दुधा एक, करडी दोन, शेगाव ११, घाणेगाव एक, सुटाळा बु. एक, खामगाव ३६, नांदुरा दोन, पोटळी तीन, पळशी एक, सोनाळा एक, हातणी दोन, किन्होळा तीन, टाकरखेड हेलगा एक, खैरव दोन, चांधई एक, अंत्री एक, पळसखेड एक, गोद्री तीन, पेनसावंगी एक, जांभोरा एक, अंचरवाडी एक, पिंपळगाव सोनाळा एक, मरखेडा दोन, दे. घुबे एक, वळती एक, चिखली २३, मलकापूर २६, उमाळी एक, सारोळा मारोती एक, सारोळा पीर एक, दे. राजा सात, डोढ्रा एक, सिनगाव जहागीर एक, अंढेरा एक, कळमेश्वर एक, डोणगाव एक, जानेफळ सहा, बऱ्हाई तीन, मेहकर दोन,  सिं. राजा एक, शेंदुर्जन एक, सावरगाव एक, आसलगाव तीन, झाडेगाव दोन, लोणार दहा, पिंपळखुटा एक, सोनुना एक, अैारंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथील एक, अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार येथील एक याप्रमाणे कोरोना बाधितांची संख्या आहे.शनिवारी सिंदखेड राजा तालुक्यातील सावळा येथील ७० वर्षीय व्यक्ती, चिखली तालुक्यातील केळवद येथील ७५ वर्षीय व्यक्ती आणि चिखली शहरातील एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत  एक लाख १९ हजार १९६ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर १४ हजार ४९६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा