शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

तीन महिन्याोत १३० जाेडप्यांनी केला नाेंदणीविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:32 IST

काेराेनामुळे राष्ट्रीय लोकअदालत रद्द बुलडाणा : राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण यांच्या दिशानिर्देशाप्रमाणे १० एप्रिल रोजी महाराष्ट्रात लोकअदालतीचे आयोजन करण्यात ...

काेराेनामुळे राष्ट्रीय लोकअदालत रद्द

बुलडाणा : राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण यांच्या दिशानिर्देशाप्रमाणे १० एप्रिल रोजी महाराष्ट्रात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. सध्या महाराष्ट्रातील कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आणि राष्ट्रीय लोकअदालतीत लोकांची गर्दी होणार असल्यामुळे राष्ट्रीय लोकअदालत अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

खडकपूर्णामुळे शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार

देऊळगावमही : खडकपूर्णा प्रकल्पाच्या निर्मितीपूर्वी परिसरात तुरळक ठिकाणच्या शेतकऱ्यांकडे रबी पिकासाठी पाणी उपलब्ध होते. देऊळगावमही परिसरात खडकपूर्णा प्रकल्पाची निर्मिती करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळेच या भागातील शेतकऱ्यांना आपले हिरवे स्वप्न पूर्ण करता येत आहे.

पीककर्ज भरण्यास मुदतवाढ द्या

बुलडाणा : शेतकऱ्यांनी बँकांकडून बिनव्याजी कर्ज घेतले आहे. ते कर्ज परतफेड करण्याची मुदत ३१ मार्च होती. मात्र, कोरोनामुळे अनेक दिवस बँक बंद होती. तसेच वाहतूकही विस्कळीत होती. त्यामुळे कर्ज भरता आले नाही. त्यामुळे पैसे भरण्याची मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पत्रकार संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी बाेर्डे

बुलडाणा : पत्रकार संरक्षण समितीने बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदी पुरुषोत्तम बोर्डे यांची निवड केली आहे. पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे, सहप्रदेश उपाध्यक्ष रामभाऊ खुर्दळ व महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिल चौधरी व पत्रकार सुभाष लहाने यांनी पुरुषोत्तम बोर्डे यांची नियुक्ती केली आहे.

नाभिक समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

बुलडाणा : नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेनाजी महाराजांनी आपल्या अभंगातून जनजागृती केली आहे. १२ व्या शतकात पर्यावरणाच्या मुळावर उठलेल्यांना पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करीत आयुर्वेदाच्या माध्यमातून दीनदुबळ्यांची रुग्णसेवा केली आहे. अशा महान संत सेनाजी महाराजांची जयंती शासकीयस्तरावर साजरी करण्यात यावी, अशी मागणी नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

माेताळा-नांदुरा रस्त्याचे काम रखडले

माेताळा : मोताळा-नांदुरा रस्त्याचे नूतनीकरण करण्यासाठी या रस्त्याचे अर्धवट खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे काही दिवसांत रस्ता चांगला होवून खड्ड्यांपासून सुटका मिळेल. अशी आशा वाहनधारक करीत होते. मात्र, रस्त्याचे काम रखडल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

राष्ट्रीय स्पर्धा विजेत्या खेळाडूंचा सत्कार

बिबी : श्रीनगर काश्मीर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आरती रमेश खंडागळे, ऋतुजा दानवे, मयूरी नागरे, या रेग्यु संघिनी यांनी राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून कांस्यपदक मिळवून देशात महाराष्ट्र संघाचे बुलडाणा जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. या खेळाडूंचा नुकताच सत्कार करण्यात आला.

प्राथमिक आराेग्य केंद्रात काेविड सेंटर द्या

धाड : कोरोनाची दुसरी लाट ही अतिशय भयावह आहे. दिवसेंदिवस त्याचा कहर वाढत चालल्याने तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व सोयींनीयुक्त कोविड सेंटरला मान्यता देण्याची मागणी हाेत आहे.

विजेच्या धक्क्याने माकडाचा मृत्यू

लाेणार : स्थानिक आझादनगरमधील व्यायामशाळेजवळ असलेल्या विद्युत रोहित्रावर माकडाने उडी घेतली. त्यात त्या माकडाला विद्युत स्पर्श होऊन विजेचा धक्का बसल्याने माकड जळून मरण पावल्याची घटना रविवारी सकाळी घडली.

मंगल कार्यालयातील विवाहांना परवानगी द्या

बुलडाणा : मागील वर्षापासून सर्वत्र कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे मंगल कार्यालय व इतर लग्नसमारंभाशी संबंधित व्यावसायिक व सर्व आस्थापने ओस पडली आहेत. त्यामुळे लग्न समारंभाशी संबंधित सर्वच व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढवले असून मंगल कार्यालयाच्या ५० टक्के लोकांच्या उपस्थितीत किंवा कमीत कमी ३०० लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा व इतर कार्यक्रमास परवानगी द्यावी, अशी मागणी हाेत आहे.