शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

आधार कार्डसाठी तीन महिन्यांची मुदत

By admin | Updated: November 17, 2014 00:51 IST

अनुदानावर सिलिंडर : पहिल्या टप्प्यात ५४ जिल्ह्यात योजना लागू.

बुलडाणा : येत्या १ जानेवारी २0१५ पासून देशभरात सुरू होणार्‍या संशोधित ह्यडायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ऑफ एलपीजीह्ण (डीबीटीएल) योजनेसाठी ज्या ग्राहकांकडे आधार कार्ड नाही अशा ग्राहकांना तीन महिन्यांची मुदत देण्यात येणार असल्याची माहिती तेल कंपन्यांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आधार कार्ड नसलेल्या ग्राहकांनाही सुरुवातीचे तीन महिने बँकेतून रोख अनुदान मिळेल. नंतर मात्र त्यांना आधार कार्ड काढावेच लागेल. गॅस सिलिंडरवरील अनुदान मिळविण्यासाठी पूर्वी ग्राहकांजवळ आधार कार्ड आणि बँक खाते असणे गरजेचे होते; परंतु शासनाने या योजनेचे संशोधन करून ग्राहकांना समस्या निर्माण होऊ नये यासाठी ह्यडायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ऑफ एलपीजीह्ण (डीबीटीएल) योजना सुरू केली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात १५ नोव्हेंबरला ५४ जिल्ह्यात ही योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर देशभरात १ जानेवारी २0१५ पासून ही योजना राबविण्यात येणार आहे. ज्या ग्राहकांनी या पूर्वीच्या योजनेत सहभागी होऊन रोख अनुदान प्राप्त केले आहे अशा ग्राहकांना नव्याने काहीच करण्याची गरज नाही. ह्यडीबीटीएलह्ण योजनेत ज्या ग्राहकांजवळ आधार कार्डचा क्रमांक नाही असे ग्राहक आधार कार्ड न दाखविता बँकेतून रोख रक्कम मिळवू शकतात. आधार कार्ड आल्यानंतर त्यांच्या आधार कार्ड क्रमांकावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल. ज्या ग्राहकांजवळ बँक खाते आणि आधार कार्ड क्रमांक दोन्ही नाही अशा ग्राहकांना पहिल्या तीन महिन्यात अनुदान देण्यात येईल; परंतु या तीन महिन्यात त्यांना आधार कार्ड आणि बँक खाते काढावे लागेल. तीन महिन्यात आधार कार्ड आणि बँक खाते न उघडल्यास या ग्राहकांना पुन्हा तीन महिन्यांची मुदत देण्यात येणार आहे.