शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

पातुर्डा फाट्यावर तीन लाखांचा गुटखा जप्त

By admin | Updated: September 30, 2015 00:30 IST

तामगाव पोलीसांची कारवाई; दोघांना अटक.

संग्रामपूर (जि. बुलडाणा): तामगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पातुर्डा फाटा येथे पोलिसांनी एका वाहनातून आणला जात असलेला तीन लाखांचा प्रतिबंधित गुटखा तसेच तीन लाखांचे सदर वाहन जप्त करून दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई २८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास करण्यात आली. तामगाव पोलिसांनी कवठळकडून येणार्‍या बोलेरो वाहनाची (क्रमांक एमएच ३५ ई११३१) तपासणी केली असता, त्यामध्ये प्रतिबंधित सुगंधीत विमल पान मसाला ४0 बॅग व व्ही-१ तंबाखु ४0 बॅग असा एकूण तीन लाखांचा मुद्देमाल आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी तीन लाख रुपयांचा गुटखा साठा तसेच तीन लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वाहनचालक व त्याच्या एका सहकार्‍यास पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सचिन परदेशी, सहायक पोलीस निरीक्षक कपील शेळक़े, पोलीस उपनिरीक्षक सुनिल बडगुजर यांनी केली. याप्रकरणी वाहन चालक प्रवीण शेषराव सिरसाठ (४५) व त्याचा सोबती विलास लक्ष्मण आगरकर (३१) दोन्ही रा. आगर (ता.जि. अकोला) यांना अटक केली असून, त्याच्यावर ३0८५/१५ कलम २६ (२) १४, ३0 (२) (ए) महाराष्ट्र अन्न सुरक्षा मानके २00६ सह कलम १७९, १८८, २७३ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र साळुंके मलकापूर व पोलीस निरीक्षक बी.आर. गिते यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कपील शेळके करीत आहेत. सखोल तपासाअंती मोठय़ा प्रमाणात गुटखा साठा पकडल्या जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.