खामगाव : ट्रक व कारची समोरासमोर धडक होवून तीन जण गंभीर झाल्याची घटना १0 मे रोजी दुपारी ३.३0 वाजेच्या सुमारास खामगावनजीक राष्ट्रीय महामार्गावर घडली. प्राप्त माहितीनुसार एमएच१९-एएक्स-२२६0 क्रमांकाची मारूती सुझुकी गाडी अमरावती येथून लग्न समारंभ आटोपून भुसावळकडे निघाली होती. दरम्यान खामगावाहून मलकापूरकडे जात असताना बायपासनजीक समोरुन येणार्या के-२५-डी-७१४९ क्रमांकाच्या ट्रकशी समोरासमोर धडक झाली. यामध्ये गाडीतील उदय येलकर (३८), सौ.रूपाली येलकर (३२), मुलगा श्रीरंग (८) हे तिघे जखमी झाले. जखमींना तात्काळ खाजगी रूग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. अपघातात कारचा समोरील भाग पुर्णता क्षतीग्रस्त झाला. घटनास्थळावरून ट्रक चालक फरार झाला होता. रस्त्यावर अपघात होवून दोनी वाहने समोरासमोर उभे असल्याने बराच वेळ ट्राफीक जाम झाली होती. घटनास्थळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय ददूस्कर यांनी धाव घेवून त्वरीत दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजुला काढली. यामुळे वाहतुक सुरळीत होण्यास मदत झाली. रस्त्याच्या बाजुला डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने एकीकडूनच वाहतुक सुरू होती. ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडल्याची माहिती आहे. याप्रकरणी वृत्त लिहिपर्यंत फिर्याद देण्यात आली नव्हती.
ट्रक व कार अपघातात तीन जखमी
By admin | Updated: May 11, 2015 02:08 IST