खामगाव : दुचाकी अपघातात तीन जण जखमी झाल्याची घटना रविवार, ९ एप्रिल रोजी टेंभुर्णा फाट्याजवळ घडली.सुटाळा बु. येथील रहिवासी सोपान महादेव लबडे (६२), शोभा सोपान लबडे (५७) व प्रमोद सोपान लबडे (३२) हे तिघे दुचाकी अपघातात जखमी झाल्याने त्यांना स्थानिक सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील शोभा लबडे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ अकोला येथे पाठविण्यात आले. अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा तोल जाऊन हा अपघात घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यात अपघाताच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाहनांची वाढती संख्या व रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघाताच्या घटनेत वाढ होऊन अनेक वाहनधारक जायबंदी होण्याच्या घटना घडत आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.तसेच अनेक वाहनधारक नियम पाळत नसल्यामुळे अपघाताच्या घटनेत वाढ होताना दिसून येते. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन जनजागृती करण्याची गरज आहे.
दुचाकी अपघातात तिघे जखमी
By admin | Updated: April 10, 2017 00:22 IST