शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अवैध व्यवसाय करणा-या तिघांना अटक

By admin | Updated: December 4, 2015 02:45 IST

अवैध व्यावसायिकांविरोधात सोनाळा पोलीसांची धडक कारवाई सुरू .

संग्रामपूर (जि. बुलडाणा) : नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या सोनाळा पोलीस ठाण्यांतर्गत अवैध व्यावसायिकांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, गुरुवारी पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ११ हजार ८00 रुपयांची देशी दारू व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्यांना न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस ठाण्यातील हद्दीत येत असलेल्या टुनकी गावात घनश्याम नंदलाल जैस्वाल, सोगोडा येथील किशोर जैस्वाल आणि वसाली येथील मांगीलाल गणपत डुडवा यांना या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण ११ हजार ९00 रुपयांची देशी दारू व दारू बनविण्याचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्या विरोधात सोनाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, न्यायालयात तिघांनाही हजर केले असता न्यायालयाने त्यांची १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई ठाणेदार सचिनसिंह परदेशी, पोलीस उपनिरीक्षक सुनील बडगुजर, पोलीस नायक श्याम कपले, एएसआय संजय सदानशिव, प्रेमसिंह बघेल, भानुदास तायडे, संतोषसिंह राजपूत, भाऊसाहेब मोरे, जाधव, राठोड यांनी सहभाग घेतला होता. सोनाळा परिसरात मोठय़ा प्रमाणावर अवैध व्यवसाय सुरू असून आतापर्यंंत हे गाव तामगाव पोलीस स्टेशमध्ये असल्याने पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत होते. आता अशा व्यावसायिकावर वचक बसला आहे.