शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी तीन दिवसांतच लावला चोरीतील आरोपींचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:28 IST

मेहकर : स्थानिक दिवाणी कोर्टाच्या पाठीमागे असलेल्या शे.इम्रान शे.गफुर यांच्या घरी १६ ऑगस्ट रोजी चोरी झाली होती. यामध्ये जवळपास ३ लाख ५0 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल करून अवघ्या तीन दिवसांतच आरोपींचा शोध लावून चार आरोपींना अटक केली आहे. 

ठळक मुद्देचोरट्यांनी ३ लाख ५0 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : स्थानिक दिवाणी कोर्टाच्या पाठीमागे असलेल्या शे.इम्रान शे.गफुर यांच्या घरी १६ ऑगस्ट रोजी चोरी झाली होती. यामध्ये जवळपास ३ लाख ५0 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल करून अवघ्या तीन दिवसांतच आरोपींचा शोध लावून चार आरोपींना अटक केली आहे. शे.इम्रान शे.गफुर हे १६ ऑगस्ट रोजी बाहेरगावी गेले होते. त्यांच्या घराला कुलूप होते. चोरट्यांनी १६ ऑगस्टच्या रात्री कुलूप तोडून घरातील रोख १ लाख २५ हजार, सोन्याच्या दागिन्यांसह  इतर दागिने अंदाजे १0 तोळे किंमत २ लाख २५ हजार व काही मोबाइल असा एकूण ३ लाख ५५ हजार रुपयांचा माल लंपास केला होता. शे.इम्रान शे.गफुर यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ४५७, ३८0 नुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्‍वर वैंजने, पोलीस निरीक्षक मोतीचंद राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गौरीशंकर पाबळे, पो.काँ. शरद गिरी, अतुल पवार, उमेश घुगे, म्हस्के, अनिल काकडे यांनी आपली तपास चक्रे जलदगतीने फिरवून अवघ्या तीन दिवसांत चोरांचा छळा लावला. गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे मेहकर येथील आरोपी शेख सलमान शेख शमीम, उमेरखान, दोस्त, मोहम्मद, मोईन, करामत खान, सर्व रा. दिवाणी कोर्टच्या पाठीमागे मेहकर व सुलतान शहा मंजुर शहा रा.हितेंद्र किराणाजवळ मेहकर यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले.सदर आरोपीकडून चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी रोख २५ हजार रुपये, १ २५ ग्रॅम वजनाचा राणी हार, ३ ग्रॅमची सोन्याची अंगठी, १ चांदीची अंगठी असा एकूण १ लाख १0 हजार रुपयांचा मुद्देमाल व गुन्हय़ात आरोपीने कुलूप तोडण्यासाठी वापरलेले हत्यार याप्रमाणे जप्त करून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक शशिकुमार मीणा, अपर पोलीस अधीक्षक डोईफोडे यांनी मेहकर पोलिसांचे कौतुक केले आहे.