खामगाव (जि. बुलडाणा) : विवाहितेवर बलात्कार करुन हा प्रकार तिच्या पतीने पाहिला असता त्याला मारहाण केल्याची घटना सोनाळा येथे घडली. याप्रकरणी शुक्रवारी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.एका ३३ वर्षीय विवाहितेने आज १३ फेब्रुवारी रोजी तामगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, गावातीलच विक्रम रमेश सरदार (वय २५) या तरुणाने पतीस तसेच मुलांना जीवे मारण्याची धमकी देत अनेकवेळा घरात घुसून बलात्कार केला; तसेच ही घटना पतीने पाहिली असता पतीलासुद्धा मारहाण केली. उपरोक्त आशयाची फिर्याद विवाहितेने तामगाव पोलीस स्टेशनला दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी विक्रम रमेश सरदार याच्याविरुध्द अप.क्रमांक १९/१५ कलम ३७६, ३२३, ५0४, ४५२ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिनसिंह परदेशी करीत आहेत.
विवाहितेवर बलात्कार करून पतीस मारहाण
By admin | Updated: February 14, 2015 01:46 IST